शेगाव : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव येथील शेगाविचा राणा संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी उद्या मंग़ळवार दि १७ नोहेंबर पासून मंदिर उघडे करण्यात असून, दर्शना साठी ई-पास घ्यावा लागणार आहे. ई- पास शिवाय प्रवेश मि़ळणार नाही. शासनाच्या गाईड लाईन नुसार भाविकांना दर्शन घ्यावे लागणार आहे.स्वत:चा किंवा दुस-यांचा स्मार्ट किंवा अँनड्राईड फ़ोन वरून ई-पास साठी नोंदणी करावी लागणार आहे. या वे़ळी आधार कार्डावरील पत्ता टाकणे बंघनकारक आहे. ई-पासचा आय.डी क्रमांक व आधार कार्ड सोबत ठेवावा लागणार आहे. तांत्रिक अड़चन आल्यास ९५२९६५८०७४ या मोबाईल क्रंमाक वर संपर्क साधावा. तसेच हार फ़ुल, प्रसाद व पुजेचे साहित्य आणू नये. ग्रंथाचे पारायण करण्यास परवानगी नाही.
संस्थेच्या अधिकृत संकेत स्थ़ळ www.gajananmaharaj.org वर ई-पास नोंदणीची सुविधा आहे.