मुंबई : नजिया नसीम या कौन बनेगा करोडपतीच्या १२ हंगामातील करोडपती बनणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहे. बुधवारी झालेल्या भागात त्यांनी १ कोटी रुपये जिंकले. या नंतर या कार्यक्रमाचे होस्ट महानायक अमिताभ बच्चन यांनी नजिया यांच्या समोर ७ कोटी रुपयांसाठीचा १६ वा प्रश्न ठेवला. नजिया या १६ व्या प्रश्नाच्या उत्तरावर ठाम नव्हत्या. त्यांच्याकडे कोणती लाईफलाईन पण शिल्लक उरली नव्हती. यामुळे त्यांनी या खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
नजिया यांना एक कोटी मिळवून देणारा प्रश्न
प्रश्न : यापैकी कोणत्या अभिनेत्रीने सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार जिंकला होता?
अ. दीपिका चिखलिया
ब. रुपा गांगुली
क. नीना गुप्ता
ड. किरण खेर
उत्तर : रुपा गांगुली
हा होता सात कोटी रुपयांसाठीचा प्रश्न
प्रश्न : नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये कोठे पहिल्यांदा आजाद हिंद सेनेची की घोषणा केली होती ?
अ. कैथे सिनेमा हॉल
ब. फोर्ट कैनिंग पार्ट
क. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर
ड. नॅशनल गॅलरी सिंगापूर
उत्तर : कैथे सिनेमा हॉल
नजिया यानी या खेळातून माघार घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नजिया यांच्याकडून त्यांचे उत्तर ऐकण्याची विनंती केली. यावर नजिया यांनी त्यांचे उत्तर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर असल्याचे सांगितले. बच्चन यांनी हे उत्तर चुकीचे असून योग्य उत्तर ‘कैथे सिनेमा हॉल’ असल्याचे सांगितले.