पुरवठ्यातील सातत्य कायम ठेवण्यासह दरावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने नाफेडने १५ हजार टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. २० नोव्हेंबरपर्यंत ही आयात करण्यासाठी निविदादेखील जारी करण्यात आली आहे.
४० ते ५० मी.मी. आकाराच्या तांबड्या कांद्याच्या आयातीसाठी निविदा जारी केली आहे. कोणत्याही देशातून हा कांदा खरेदी केला जाईल, असे नाफेडने म्हटले आहे. किमान २ हजार टन व त्यापुढे प्रत्येकी पाचशेच्या लॉटमध्ये हा कांदा आयात केला जाईल.
४ नोव्हेंबर ही निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख असून याच दिवशी निविदा उघडल्या जातील. कांद्याची डिलिव्हरी जेएनपीटी किंवा कांडला बंदरावर द्यावी लागेल, असेही नाफेडने सांगितले आहे.