• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा ;उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 26, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार येवून एक वर्ष पुर्ण होत आहे.मुख्यमंत्री म्हणून मी कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेकजण सरकार पडेल,असे स्वप्न बघत आहेत. असे सांगतानच,हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे थेट आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले आहे.दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली.

कोरोनाच्या संकटामुळे शिवसेनेचा दरवर्षी होणार दसरा मेळावा या वर्षी शिवाजी पार्कात न होता काही निवडकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून,राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व होते.आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.शिवाय नारायण राणे,भाजपा, रावसाहेब दानवे,राज्यपालांवर शरसंधान साधले.या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.सरकार स्थापन व्हायला एक वर्ष होत आले आहे.मी ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेक जण सरकार पडेल,अशी स्वप्न बघत आहेत.त्यानुसार तारीख पे तारीख देत आहे असे सांगतानाच, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे थेट आव्हान देतानाच, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकणारे मुगळे नाहीत. पण जर वाटेल जाल तर मुगळा कसा डसतो ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत अशा इशाराही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मी वाघाची औलाद आहे,असे सांगतानाच,त्याला जर डिवचले तर काय होते.त्याचे इतिहासात दाखले आहे आणि भविष्यातही पाहायला मिळतील, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याला आडवा करुन गुढीपाडवा उभारण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला वाघ पाहून तो लपला अशी टीका मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाव न घेता राणे पिता पुत्रावर केली.आपल्या भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावरही निशाणा साधला.घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचे हिंदुत्व असा सवाल करतानाच,आमचे हिंदुत्व असले नाही,हिंदुत्व हे आमचे राष्ट्रीयत्व असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.कोरोनाचे संकट असतनाही सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय ? असा सवाल करून पक्षावर आणि देशावरही थोडं लक्ष द्या असा टोला त्यांनी भाजपला लगवाला.

देश रसातळाला चालला आहे असे सांगून,देश कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला.क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही असे सांगतानाच, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.जीएसटीच्या परताव्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा खरपूर समाचार घेतला.जीएसटीच्या परताव्यावरून दानवे यांनी राज्य सरकावर टीका केली होती, लग्न तुम्ही केले आणि पैसे बापाकडे मागता ? अशा शब्दात टीका करणा-या दानवेंचा समाचार यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. दानवेजी बाप तुमचा असेल,माझा बाप इकडे आहे.माझ्यासोबत आहे.मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत.लग्न आम्ही केलं.पण लग्न करताना बाप तर सोडाच, आहेराची पाकिटं ज्याला देत होतो. तो सुद्धा आहेर घेऊन पळालेला आहे.अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी दानवे यांच्यावर टीकेची तोफ डागली.

माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही असे सांगतानाच आज महिलांवर अत्याचार होत आहेत, हत्या होत आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात मग तो गोव्यात का केला नाही ? इथे गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यपालांचाही समाचार घेतला.हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत.का तर मंदिरे उघडले नाहीत म्हणून.पण आम्हाला कोण विचारतय असा सवाल उपस्थित करीत ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते अशा शब्दात त्यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले.कदाचित त्या वेळेला ज्यांचे नाव त्यांच्या कुटुंबाशिवाय कुणालाही माहिती नव्हते ते आम्हाला विचारताहेत तुमचे हिंदुत्व कुठे गेले ? तुम्ही अचानक सेक्युलर झालात ? असेही ते म्हणाले.

आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना रानावतचे नाव न घेता समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत महाराष्ट्रात यायचे आणि नंतर दाखवायचे की आम्ही कष्ट केले. मुंबई, महाराष्ट्राचे मीठ खायचे आणि नमक हरामी करायची ही असली रावणी औलाद, महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायची. महाराष्ट्रात पुढे जातो म्हणून बदनामी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बिहार निवडणुकीवरून भाजपला लक्ष्य केले. बिहार विधानसभा निवडणुकीत सरकार आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. यावर बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांग्लादेश की पाकिस्तानात आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला.

Tags: उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीसरकार
Previous Post

जवाहर नगर चौकाच्या बगीच्यात खेळायला गेलेल्या बालिकेची छेड काढणाऱ्या इसमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; आरोपी गजाआड

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 166 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 166 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह

अहवाल पॉझिटीव्ह

32 अहवाल प्राप्त; एक पॉझिटीव्ह, 12 डिस्चार्ज, तीन मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.