अकोट( देवानंद खिरकर )- घरकुल प्रकरणी तसेच गोरगरीब जनतेच्या विविध समस्यांबाबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे हे सपत्नीक दिनांक १९/ऑक्टो/२०२० ला अकोट नगरपरिषदेच्या प्रांगणात शेकडो लाभार्थ्यांसह आमरण उपोषणाला बसले असता आज पालकमंत्री बच्चू भाऊ कडू,आमदार नितीन देशमुख यांनी या उपोषणाची गंभीर दखल घेत तात्काळ अकोला जिल्हाधिकारी,अकोट उपविभागीय अधिकारी अकोट तसेच अकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी वरील नमूद केलेल्या मुख्य मागण्यांसंदर्भात दूरध्वनीवरून सकारात्मक चर्चां केली.त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय मिळाला पाहिजे ही भावना ठेवत योग्य त्या सूचना दिल्या.
या प्रभावी व लोकहिताच्या आंदोलनाला आज उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे,नगरपरिषद मुख्याधिकारी गोपीचंद पवार,नगरपालिका अभियंता उमेश माळी यांनी सायं ७:०० वाजता भेट देत दिलीप बोचे यांच्या सर्व मागण्याबाबत उपस्थितांसमोर चर्चा करून लेखी स्वरूपात देत मागण्या मान्य केल्या.व शरबत पाजुन उपोषण सोडले.या आंदोलनात आमदार नितीन देशमुख,आमदार गोपिकीशन बाजोरिया,माजी आमदार संजय गावंडे यांनी याबाबत जी आवश्यक मदत लागणार त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून ह्या मागण्या मंजूर करण्याचे कळविले.
यादरम्यान कालपासून विविध पक्षातील नेते तथा पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी,तालुक्यातील जेष्ठ प्रबोधनकार,साहित्यिक,पत्रकार,लेखक,कवी,समाजसेवक यांनी सुद्धा या आंदोलनात सक्रिय सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला.त्यामध्ये आज प्रामुख्याने राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज,जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष हिदायत पटेल,ह.भ.प.विठ्ठल महाराज साबळे,ह.भ.प.गणेश महाराज शेटे,असंघटित कामगार सेल काँग्रेस चे अध्यक्ष बदरूजम्मा,माजी नगराध्यक्ष ब्रिजमोहन गांधी,जि.प.सदस्य गजानन डाफे,शिवसेना मनपा गटनेते राजेश मिश्रा,अकोला शहर संघटक तरुण बगेरे,नगरसेवक योगेश गीते,शिवसेना जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने,तालुका प्रमुख श्याम गावंडे,प्रहार उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे,शहर प्रमुख सुनील रंधे,प्रहार तालुका अध्यक्ष कुलदीप वसू,नगरसेविका जयश्रीताई बोरोडे,पं. स.सदस्य ज्ञानेश्वर दहीभात,नगरसेवक आरिफ भाई,नगरसेवक अफजल भाई,नगरसेवक मुक्तार भाई,नगरसेवक दिनेश घोडेस्वार,जेष्ठ शिवसैनिक विजय ढेपे,डॉ.गजानन महल्ले,डॉ.अरविंद लांडे यांनी भेट दिली.
नगर परिषदेमधील घरकुल योजनेचा लाभ गरजु नागरीकांपर्यंत अद्यापही पोचलेला नाही हे वारंवार निदर्शनास येत होते.यासोबत शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या शासनाच्या विविध योजनांबाबतच्या सततच्या तक्रारी येत होत्या.त्याबाबत नगरपालिका महसूल विभाग तहसील कार्यालयात उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी स्वतः तसेच पत्नी नगरसेविका सौ.विजया बोचे यांच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदने दिली पाठपुरावा केला परंतु तरीही याबाबत गोरगरीब जनतेविषयी कोणत्याही अधिकाऱ्याची भूमिका ही सकारात्मक दिसली नाही करीता उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी शांतीच्या मार्गाने हे उपोषण मांडले होते.यावेळी दिलीप बोचे यांच्यासोबत पत्नी सौ.विजया बोचे,सौ.जयश्रीताई बोरोडे,संजय भट्टी,प्रदिप कदम,सारिका कदम,प्रकाश गाडगे,गोविंद चावरे,मीना पौड,लता दांडगे हे उपोषणकर्ते सोबत बसले होते.उपोषणस्थळी आज दिवसभरात असंख्य नागरिकांनी भेटी दिल्या त्यामध्ये श्रीजित कराळे,विलास तळोकर,रोशन पर्वतकार,राहुल सपकाळ,विजय भारसकळे,सुनील गावंडे,तुषार पाचकोर,अतुल पांडे,रमेश खिरकर,प्रफुल बदरखे,सुभाष सुरत्ने,डिगांबर सोळंके,सागर उकंडे,किशोर देशमुख,प्रभाकर ठाकरे,समीर जमादार,केशवराव खारोडे,भगवान कांगळे,राजू थोरात,प्रकाश बरेठीया,विलास जाधव,महादेव पाउळ,रमेश बारस्कर,बबन शिंदे,गोपाल म्हैसने,दिलीप लेलेकर,दिवाकर सातपुते,योगेश सुरत्ने,शुभम जाधव,अमर काबिलीये,सुनील पौळ यांच्यासह शेकडो लाभार्थी शिवसैनिकांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शविला.