अकोला,दि. 19 (जिमाका)- अकोला जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत स्वयंसहायता गटांकडून नविन रास्तभाव दुकानाचे प्रस्ताव दि. 15 ते 30 ऑक्टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे. नविन शिधावाटप दुकाने परवाना अर्जाचे नमूने प्रत्येकी शंभर रुपये भरुन प्राप्त होतील.
मुर्जिजापूर तालुक्यातील कार्ली, आमतवाडा, बाळापूर, चीचखेड,धानोरा पाटेकर, गोरेगाव, हेडज, कमळणी, कमळखेड, खोडद, लंघापूर, मुर्तिजापूर वार्ड क्रमांक 21, सूलपूर, सुलतानपूर व सोनाळा या 16 गावातील दुकानाकरीता तसेच पातूर तालुक्यातील चांगेफळ दु.क्र.49, पळसखेड दु.क्र.74, खानापुर दु.क्र. 12, पार्डी दु.क्र. 78, विवरा (किरतकार यांचे दुकान दु.क्र.28), जाभरुण दु.क्र.69, हिंगणा(वा) दु.क्र.88, सोनुना दु.क्र.91, कोठारी खुर्द दु.क्र. 82, गोळेगाव दु.क्र.94, दादुलगाव दु.क्र.76, बाभळी दु.क्र. 75, निमखेड दु.क्र.93 या 13 गावातील दुकानाकरीता जाहिरनामे काढण्यात येणार आहे.
स्वयंसहायता गटांची निवड करतांना स्थानिक महिला स्वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्य राहील. महीला स्वयंसहायता गट उपलब्ध न झाल्यास पुरूष स्वयंसहायता गटाचा विचार करण्यात येईल. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज (अध्यक्ष व सचिव सुस्पष्ट फोटोसह), अध्यक्ष व सचिव यांचा एकत्रित फोटो, स्वयंसहायता गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, स्वयंसहायता गटाचे आर्थिक स्थितीबाबत साक्षांकित कागदपत्रे, उदा. पासबुक व बँकेचे प्रमाणपत्र, व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत कागदपत्रे, जागा भाडयाची असल्यास भाडेपत्र, घरटॅक्स पावती, जागेचा 7/12, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणचे क्षेत्र (चौ.फुट), बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेकडून प्राप्त झालेले), आंकेक्षन अहवाल मागील तीन वर्षाचा, स्वयंसहायता गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सभासदांची नांवे पत्यांसह, गटाचे मुळ व आजचे भाग भांडवल व सध्या करीत असलेला व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती, रास्तभाव व किरकोळ केरोसीन परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्यात संमती दर्शविलेला गटाचा ठराव, रास्तभाव व केरोसीन परवाना स्वयंसहायता गट स्वत:, एकत्रितरीत्या चालवित आणि कोणत्याही इतर व्यक्ति, संस्थेला चालविण्यास देणार नाही. याबाबत सर्व सदस्यांचे एकत्रीत प्रतिज्ञापत्र (तहसिलदार यांचेकडून साक्षांकित केलेले) मुळ प्रत, अर्ज त्याच भागातील स्वयंसहायता गटांनी करावयाचे आहेत.