वाडेगांव ( डॉ . शेख चांद)- बाळापूर तालुक्यातील वाडेगांव, देगांव, मानकी, पारस, बटवाडी, खिरपूरी, व्याळा, भरतपूर, दिग्रस इत्यादी परिसरात परतीच्या पावसामुळे व अति वादळ व पावसामुनळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, उळीद, मुंग, ज्वारी, कापूस इत्यादी पिकांचे मोठया प्रमाणात तुकसान झाले असून तोंडातला घास हिसकल्या गेले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे . संपुर्ण वर्षाचे गणित शेतकऱ्यांचे पिकावर अवलंबुन असते. ऑगस्ट , सप्टेंबर महीन्यात अतीपाऊस व वादळी वाऱ्यामुळे व आता परतीच्या पावसामुळे खुप मोठया प्रमानात पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी ही अंधारात जानार आहे. परंतु महसुल विभागाने बाळापूर तालुक्यातील पिकांची पैसेवारी ७२ पैसे घोसीत केली असून यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळनार का ? अशा प्रश्न निर्मान झाला आहे. कारण नुकसान भरपाई मिळण्यासाठी कमीत कमी पिकांची पैसेवारी ५० पैसा पेक्षा कमी पाहीजे आता शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कशी होणार अशा प्रश्न शेतकरी वर्गात निर्माण झाला आहे.शेतकरी मात्र मोठया संकटात सापडला आहे. सोगलेला सोयाबीन गेला पाण्यात व मातीत शेतकऱ्यांच्या झालेल्या सोयाबीन, मुंग, उळीद, ज्वारी, कापूस या पिकांच्या नुकसाना कडे संबंधीत विभाग, अधिकारी व शासन या कडे लक्ष देणार का ? शेतकरयांची पिकांची पैसेवारी ७२ पैेसे पेक्षा कमी होणार का ?