हिवरखेड(प्रतिनिधी)- शहरातील जवळपास सर्वच प्रभागातील बंद असलेले पथदिवे लावून आवश्यक त्या त्या ठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी पत्राद्वारे माजी सरपंच संदीप इंगळे यांनी केली आहे.
हिवरखेड शहरात सहा प्रभाग असून झालेल्या पावसामुळे सहाही प्रभागातील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद पडलेले आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे अपघातासह चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तसेच पाऊस सुरू असल्यामुळे नवीन वस्त्यांमध्ये साप, विंचू यासारखे प्राण्यांद्वारे जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात आवश्यक त्या त्या ठिकाणी पथदिवे लावावेत तसेच शहरातील काही भागात अस्वच्छता निर्माण झाली आले यामुळे रोगराई वाढून डेंगू सारखे आजारही होत असल्याची माहिती आहे अगोदरच कोरोना या महामारीने थैमान घातले आहे म्हणून ग्रामपंचायतीकडून साफसफाई व राहिलेल्या प्रभागांमध्ये फवारणी करून अस्वच्छ परिसर स्वच्छ करावा जेणे करून रोगराई होणार नाही. अशी मागणी माजी सरपंच संदीप इंगळे यांनी पत्राद्वारे ग्रामपंचायच प्रशासनाला केली आहे.
ज्या प्रभागातील पथदिवे बंद आहेत तेथील नागरिकांनि ग्रामपंचायतीकडे लेखी मागणी करावी त्याप्रमाणे आवश्यक त्या त्या ठिकाणी पथदिवे लावण्यात येतील
बी. एस. गरकल, सचिव