अकोला (प्रतिनिधी )- दिनांक १० आक्टोबर २०२० रोजी अकोट फैल येथिल आशा बेघर निवारा महानगरपालिका अकोला य़ेथे जागतिक बेघर दिवस साजरा करण्यात आला.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टीट्युट बार्टी,पुणे चे अकोला जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय पी.बेदरकर यांनी बेघर निवारा वासीयांशी हीतगुज करत कोरोनावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले तसेच व संविधान उद्देशिका व बार्टी प्रकाशन विभागाची पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यासह कोरोनामध्ये घ्यावयाची काळजी सामाजीक अंतर व मास्कचा वापर करावा यासाठी मनिष हीवराळे यांनी माहीती दिली.सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी बेघर निवारा येथिल काळजीवाहक अक्षय बुंदेले,महीला काळजीवाहक सौ.उषा राऊत,सुरक्षा रक्षक सोनु ठाकुर,शुभम ठाकुर व्यवस्थापक शंतनु भड यांनी परीश्रम घेतले.आशाकिरन संस्थेच्या वतीने अध्यक्षा दुर्गा भड यांनी बेघर वासीयांना फळे वाटप केली.कार्यक्रम हा अतिशय स्वच्छता पूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी उपस्थित सर्वानी सामाजिक अंतर पाळत मास्क लावलेले होते.तसेच गरजेनुसार सॅनिटायझर चा उपयोग या कार्यक्रमात करण्यात आला.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.