अकोट(देवानंद खिरकर)- नायब तहसीलदार राजेश गुरव यांना गोपनीय माहीती मिळाल्या वरुन आज दिनांक 10/10/ 2020 रोजी सकाळी पाच वाजता मौजा बोर्डी येथे टी पॉईंट जवळ ट्रॅक्टर वाहन क्रमांक MH30 BB 0368 व ट्रॉली विना नंबर 1 ब्रास रेती विनापरवाना,विना रायल्टी घेऊन जात असतांना पकडण्यात आला.व पोलीस स्टेशन अकोट शहर येथे लावण्यात आला आहे.सदरची कारवाई ही राजेश गुरव नायब तहसीलदार अकोट, मनोहर आढाऊ मंडळ अधिकारी मुंडगाव,विशाल शेरेकर तलाठी तांदुळवाडी यांनी केली आहे.या आधी बोर्डी येथिल तलाठी खामकर व मंडळ अधिकारी यांच्या आशिर्वादाने व हप्तेखोरी मुळे बोर्डी येथे अवैध रेतिची खुलेआम चोरी या बाबत च्यायनल,पेपरला नावानिशी वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते.व काल नायब तहसीलदार राजेश गुरव अकोट यांनी स्वताहा केलेली धडक कारवाई वरुन सिध्द होत आहे की बोर्ड़ीचे तलाठी व मंडळ अधिकारी यांंना बोर्डी येथिल सुरु असलेल्या रेतिच्या ट्रक्टर बाबत खरोखर पूर्णपणे माहिती असुन सुध्दा रेतिचे ट्रक्टर पकडून कारवाई केल्या जात नाही ही उल्लेखनिय बाब आहे.बोर्डी येथे लाखो रुपये किमतिची रेतीची चोरी सुरु आहे व शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत आहे.याला कारणीभूत फक्त बोर्डीचे तलाठी खामकर यांच्यामुळे तरी वरिस्ठ अधिकारी यांनी बोर्डी येथिल अवैध सुरु असलेल्या रेतिची दखल घेवून बोर्ड़ीचे तलाठी खामकर यांची बोर्डी येथुन तात्काळ बदलीचे आदेश द्यावे व बोर्डीला नवीन तलाठ्याची नियुक्ती करावी अशी मागणी अर्जदार यांनी केली आहे.तरी आता वरिस्ठ अधिकारी हे काय निर्णय घेतात याकडे अर्जदार यांचे लक्ष लागले आहे.