देशाच्या राजकारणातील दिग्गज, लोकजनशक्ती पार्टीचे ज्य़ेष्ठ नेते राम विलास पासवान यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. गेल्या पाच दशकांपासून बिहारसह देशाच्या राजकारणात छाप असणारे आणि व्ही. पी. सिंह यांच्यापासून नरेंद्र मोदींपर्तंयतच्या पंतप्रधानांसोबत मंत्रिमंडळात काम केलेल्या या नेत्याच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे.
रामविलास पासवान यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज त्यांच्या दिल्ली निवासस्थानी १२ जनपथ येथे सकाळी दहा वाजता रुग्णालयातून आणण्यात येईल. दुपारी अडीचनंतर त्यांचे पार्थिव पटना येथील लोक जनशक्ती पार्टी कार्यालयात नेले जाईल. दुसर्या दिवशी शनिवारी पाटणा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रामविलास पासवान यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्विट करून दिली होती.चिराग पासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “पापा …. आपण यापुढे या जगात नाही परंतु मला माहित आहे आपण जिथे जिथे आहात तिथे नेहमीच माझ्याबरोबर आहात. मिस यू पापा …”
रामविलास पासवान यांचा जन्म 5 जुलै 1946 रोजी बिहारच्या खगारिया येथे झाला.रामविलास पासवान यांची देशातील दिग्गज नेत्यांमध्ये गणना होते. ते ५ दशकाहून अधिक काळ राजकारणात राहिले. रामविलास पासवान हे ९ वेळा लोकसभा आणि दोन वेळा राज्यसभेचे खासदार होते.
रामविलास पासवान यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व राजकारण्यांच्या प्रतिक्रिया आल्या. पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले, “मी शब्दांच्या पलीकडे दु: खी आहे. आपल्या देशात अशी एक शून्यता आहे जी कदाचित कधीच भरु शकत नाही. रामविलास पासवान जी यांचे निधन हे वैयक्तिक नुकसान आहे. मी एक मित्र, मौल्यवान सहकारी आणि अशी व्यक्ती गमावली. , जो प्रत्येक गरीब व्यक्तीचे सन्माननीय जीवन जगण्यासाठी खूप उत्सुक होता. “