अकोट(देवानंद खिरकर) – स्थानिक अकोट शहरातील शेतकरी मोटर्स येथे मेगा सर्विस कार्निवल अंतर्गत जेसीआय अकोट व रोटरी क्लब ऑफ अकोट च्या वतीने रस्ता सुरक्षा ह्या विषयावर प्रथमतःच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ह्या मध्ये २० स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला ह्या कार्यक्रमाचे उदघाटन अकोट ग्रामीण चे ठाणेदार श्री ज्ञानोबा फड ह्यांनी केले ह्या वेळी जेसीआय चे अध्यक्ष पवन ठाकूर, जेसिरेट विंग चेअर पर्सन मंगलाताई गणोरकार , रोटरीचे संजयजी बोराेडे माजी अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार उपस्थित होते.
ह्या स्पर्धेची विशेषतः म्हणजे सर्वच स्पर्धकांनी शासकीय नियमाचे पालन करून म्हणजे मास्कचा वापर,सॅनी टायजर वापर ,थर्मल चेकिंग सोसिअल डिस्टन्सीग राखून स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला.स्पर्धेकरिता सकाळी नऊ वाजता पासून तर दुपारी पाच वाजेपर्यंत रांगोळी काढण्यात आल्या ज्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी गर्दी झालेली नव्हती . सध्याच्या ह्या कोरोना महामारीत अपघाताचे प्रमाण कमी झाले असून ते असेच कमी राहावे ह्या साठी लोकांमध्ये रास्ता सुरक्षितते बदल जनजागृती व्हावी म्हणजे गाडी चालवितांना मोबाईलचा वापर करू नये, जास्त वेगात गाडी चालवू नये , वाहतुकीचा नियम चे पालन करावे ,नेहमी हेल्मेट वापरावे रोड सिग्न चा वापर करावा,मद्यपान करून गाडी चालवू नये,सीट बेल्टचा वापर करावा असे अनेक संदेश ह्या रांगोळी मधून सर्व कलावंतानी दिले .ह्या स्पर्धे मध्ये स्पर्धकांची नावे आकांशा दीपक सावळे,संदेश पंजाबराव चोंडेकर,अंकिता गजानन गोठवलं,वर्षा शेखर हुसे ,गौरव शरद काळे, ऋतुजा माधव काळे,अंकिता रमेश उपासे, स्नेहा श्याम बहादूरे ,स्वाती संदीप कोकाटे , धनश्री नंदकिशोर शेगोकार, दीपाली विनोद कडू. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता करीत जेसीआय चया मीना शेगोकार ,दीपाली कडू ,माया इंगळे,विवेक गणोरकर, विनोद कडू निलेश इंगळे यांनी प्रयत्न केले .