तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा नगरपालिके मध्ये सुरु असलेल्या प्रधानमंत्री आवास योजने मधील लाभार्थियांना जाचक अटीचा निपटारा करून त्यांचे घरकुल मंजूर करावे व ज्यानचे घरकुल चे काम सुरु आहे त्यांना पुढील टप्प्याचे अनुदान विनाविलंब देण्यात यावे या करिता आज ७ ऑक्टम्बरला शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन नगरपालिकेला घेराव घालून ठिय्या आंदोलन करून आधी मंजूर व नंतर जाचक अटीच्या कागदपत्राची होळी करून नगरपालिके प्रति आपला रोष व्यक्त केला या वेळी कुलुप लावलेले पालिकेचे प्रवेशद्वार तोळन्याचा प्रयत्न केला असता ठानेदरांच्या मध्यस्थि मुळे पुढील अनर्थ टळला .
तेल्हारा नगर पालिकेत प्रधानमंत्री आवास योजना सुरु आहे केंद्रात व पालिकेत भजपाची सत्ता असतांना सुद्धा केन्द्रशासनाचा घरकुल साठी निधि मिळाला नाही त्यामुळे घरकुल चे काम सुरु करणारे लाभार्थि अळचनीत सापळले आहेत राज्यशासनाकळून मिळालेल्या निधिमधुन त्यांना दोन टप्पे देण्यात आले उर्वरित निधि आणण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी निष्क्रिय ठरले आहेत .तसेच आधी घरकुल मंजूर झाल्याचे पत्र दयावयचे नंतर १७ महिन्यांनि जाचक अटीचे पत्र देऊन घरकुल धारकांचा मानसिक छळ पालिकेने चलविला आहे N . A. बाबत सात महिन्यापूर्वी घेतलेल्या ठरावाची पालिकेने अद्याप पर्यत अंमलबजावणी च केली नसून पालिकेने बेजबाबदार पनाचा कळस गाठला आहे . हा सर्व प्रकार चिळ आननारा आहे घरकुल धारकाना पुढील टप्प्याचे अनुदान मिळावे . व ज्यांचे घरकुल मंजूर झाले नाहि त्या सर्वाना सदर ठरावाची अंमलबजावणी करून लाभ देण्यात यावा या मागणी साठी शिवसेना व युवासेनेच्या वतिने आक्रमक भूमिका घेऊन नगरपालिकेला घेराव घालून ठिय्या आंदोलन करून आधी मंजूर व नंतर जाचक अटीच्या कागदपत्राची होळी करून नगरपालिके प्रति आपला रोष व्यक्त केला तसेच या वेळी नगरपालिकेने आंदोलन करते आत येऊ नये याकरिता मुख्य प्रवेश द्वाराला कुलुप लावले असता आक्रमक झालेल्या शिसैनिकानी दरवाजा तोळून आत जाण्याचा प्रयत्न केला असता ठानेदार विकास देवरे यांनी मध्यस्थि करुन दरवाजा उघळून मुख्याधिकारी यांना भेटू दिले शिवसैनिक आक्रमक ज़ाल्याचे दिसून आले या वेळी विरोधी पक्ष नेते मितेश मल्ल यांनी आपल्या सर्व नगरसेवकांचा शिवसेनेच्या रास्त मागनीला पाठीबा दिला . या वेळी आंदोलन कर्त्यानी हाता मध्ये फलक घेऊन कमिशनचे चालू आहे घेणे देने म्हणून आमच्या प्लॉट चे केले नाहि N A , जो गरीब है’ शिवसेना उसके करीब है। , फक्त कमिशनची घाई म्हणे आता घरकुल नाही , राज्य सरकारचा निधि मिळाला मग केंद्र सरकार चा गेला कुठे , केंद्र सरकार चा निधि खेचुन आननार कधी ? ,ठेकेदारांचे कामे जोरात घरकुल वाले कोमात ,अस कस देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही , असे गगन भेदी नारे देण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी यांनी आंदोलन कर्त्यांचे म्हणणे यैकुन ते सोळविन्याचा प्रयत्न करू असे सांगितले . या वेळी आंदोलना मध्ये शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड़ , शहर प्रमुख विक्रांत शिंदे , माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के , राजेश वानखड़े , युवासेनेचे जिल्हा प्रवक्ते प्रा.सचिन थाटे , उपतालुका प्रमुख अजय गावंडे , संजय अदाऊ , गोपाल विखे , माजी नगरसेवकन रामभाऊ फाटकर , युवासेना शहर प्रमुख राम वाकोडे , गजानन सोनटक्के स्वप्निल सूरे, माधव जामोदे , बाळासाहेब निमकर्डे , सुनील खरोडे , मुन्ना गावत्रे , संतोष राठी , गजानन मोरखडे , अक्षय गावंडे ,गौरव धुळे , श्याम महोरे , वैभव देशमुख , प्रज्वल मोहोड़ , आदेश महल्ले , आशीष राठोड, अंकुश आठवले , इत्यादि शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते .ठानेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस बंदोबस्त चोख होता .
प्रधानमंत्री आवास योजनेअन्तर्गत घरकुल धारकाना पुढील अनुदान मिळवून देण्यासाठी व ज्याना अद्याप लाभ मिळाला नाही त्या घरकुल धारकांचे प्रश्न सोळविन्यासाठी मि सर्वतोपरी प्रयन्त करेल तसेच नागरिकांच्या इतर समस्या काही दिवसातच मार्गी लावू
मनोहर अकोटकार
मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा