अकोला(प्रतिनिधी)- सम्यक विद्यार्थी आंदोलन ही अँड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेली विद्यार्थी संघटना आहे. कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यातील विद्यार्थी व पालक वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या त्रस्त झाले आहे. ऑनलाइन शिक्षण, शिष्यवृत्ती, शिक्षण हक्क, कायद्याची रिक्त जागा, परीक्षा अशा वेगवेगळ्या समस्यांमुळे विद्यार्थी अडचणीत सापडत आहे.
या विद्यार्थी-विद्यार्थिनींना संकटाच्या काळात मदत करण्यासाठी मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला च्या वतीने विद्यार्थी संपर्क संवाद अभियान राबविण्यात येत आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला च्या वतीने बैठक घेऊन सर्व पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न घेण्यात यावे.
ऑनलाइन परीक्षेसाठी लागणारे मोबाईल, लॅपटॉप, डेक्सटॉप इत्यादी संसाधने उपलब्ध नाहीत त्यासाठी मदत मिळावी या हेतूने प्रत्येक तालुक्याला निरीक्षक नेमल्या गेले आहे. परीक्षेपासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये याची संपूर्ण दक्षता सोबत असतात घेण्यात येत आहे. परीक्षेसंदर्भातील अडचणी शैक्षणिक अडचणी आणि आवश्यक सुविधा मिळाव्या या उद्देशाने विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात येत आहे. की आपण आपल्या तालुक्यातील निरीक्षकांशी संपर्क साधावा. सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला आपले प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहे.
बैठकीमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष राजकुमार दामोदर, जिल्हा महासचिव प्रतुल विरघट, धिरज इंगळे, हर्षदा डोंगरे जिल्हा संघटक आकाश गवई, जिल्हा प्रवक्ता विशाल नंदागवळी जिल्हा सचिव सुमित भांबोरे,मंगेश वरठे,कपिल वानखडे, शेखर इंगळे, अंकित इंगळे, प्रथमेश गोपणारायन,नागसेन अंभोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.