तेल्हारा(प्रतिनिधी)-तेल्हारा तालुका युवक काँग्रेस तर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अती पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी याकरिता मा. तहसीलदार तेल्हारा यांना आज दि. 28/09/2020 रोजी निवेदन देण्यात आले.
तेल्हारा तालुक्यात 25,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड आहे तर त्यातील 8000 हेक्टर क्षेत्रावर बागायती कपाशीचे लागवड आहे, परंतु अती पावसामुळे बागायती कपाशीचे 50% बोंड सडल्यामुळे कपाशी पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन निर्णयानुसार 33% नुकसान झाले असले तर शासन याकरिता मदत करते. असे असताना हा प्रश्न मार्गी लावावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच कपाशी प्रमाणे सोयाबीन, उडीद, मूंग या पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पिकांचे सुद्धा त्वरित पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष अनंत सोनमाळे, अड संदीप देशमुख, नितीन वाकोडे, योगेश जुंबळे, अनंता दही व तालुक्यातील युवक काँग्रेस च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तेल्हारा तहसीलदार यांना केली.