अकोट(देवानंद खिरकर) – अकोट शहर प्रभाग क्रमांक ७ पाचपोर प्लॉट मधील रहिवाशी यशोधा वसंतराव लोणकर ह्या निराधार महिलेच्या घरावर काही दिवसांपूर्वी निसर्गाने घाला घातला.ज्यामध्ये हवा व मुसळधार पाऊस सुरू असतांना एक मोठे वृक्ष या महिलेच्या कच्च बांधकाम असलेल्या घरावर कोसळले त्यामुळं घराचे संपूर्ण नुकसान झाले आहे.ही महिला निराधार असून तीच राहत घर आज संपूर्ण क्षतीग्रस्त झालं आहे.आज कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीत या मजूर महिलेकडे मुबलक रोजगार नाही,उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज काबाडकष्ट करनाऱ्या ह्या महिलेवर खूप मोठं संकट ओढवल आहे.
शिवसेना नगरसेवक तथा गटनेते मनीष रामाभाऊ कराळे यांनी या महिलेच्या क्षतीग्रस्त घराला भेट दिली असता या दुर्दैवी दुर्घटनेमुळं आज त्या महिलेची परिस्थिती पाहता तिला कशाप्रकारे मदत करता येईल यासाठी प्रयत्न केले.नगरसेवक मनीष कराळे यांनी अकोट जिनिंग प्रेसिंग सोसायटी चे अध्यक्ष श्री.अनिल काका पाचडे यांची भेट घेऊन त्यांना महिलेची संपूर्ण परिस्थिती सांगितली असता श्री.अनिल पाचडे यांनी या महिलेला तुरंत आर्थिक स्वरूपात मदत दिली.तसेच नगरसेवक मनीष कराळे यांनी या महिलेला धान्य व तांदूळ स्वरूपात मदत केली.यासोबत घटनास्थळी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन मनीष कराळे यांनी या निराधार महिलेला शासनाकडून शक्य तितकी मदत मिळवून देण्यासाठी तसेच पडलेल्या घराची शासनाने मदत म्हणून दुरुस्ती करून द्यावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.यावेळी रुपेश शेंडे,गजानन मोहिते,पद्माकर तेलगोटे,वैभव गोतमारे,कमलाबाई भारती,सुर्यकांता नांदूरकर,मिनाबाई गोतमारे,प्रकाश गोतमारे यांच्यासह प्रभाग क्रं.७ मधील रहिवासी उपस्थित होते.