• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यात 12,528 पोलिसांची भरती

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 17, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
गृहमंत्री
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई :

राज्यात लवकरच मेगा पोलिस भरती होणार आहे. पोलिस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 रिक्‍त पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर ही माहिती पत्रकारांना दिली. पोलिस भरतीची प्रक्रिया व वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात पोलिस दलातील सर्व साडेबारा हजार रिक्‍त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती कोलमडल्यामुळे वित्त विभागाने मे महिन्यात सरकारी नोकरी भरतीला संपूर्ण स्थगिती दिली होती. त्यामुळे पोलिस भरती होणार की नाही याबाबत संदिग्धता होती.

कोरोना काळात पोलिसांची 24 तास रस्त्यावर ड्युटी

कोरोनाच्या काळात पोलिस 24 तास जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्‍त ताण वाढला होता.शिवाय मागील सहा महिन्यांत अनेक पोलिस कर्मचारी निवृत्त झाले आहेत. तर पुढील सहा महिन्यांत हजारो पोलिस कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या भरतीला मंजुरी देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावरची लढाई लढत असलेल्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग झालेला आहे. आजवर राज्यातील सुमारे 17 हजारांच्या आसपास पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

यातील अनेक कर्मचारी उपचार घेत आहेत. शेकडो जणांचे बळी गेले आहेत. 55 वर्षावरील पोलिसांना कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे. तर विविध आजाराचा इतिहास असलेले कर्मचारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत पोलिस दलाला मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले. वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या नोकर भरती स्थगितीच्या शासन निर्णयातून पोलिस भरतीबाबत सूट देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Tags: पोलिस
Previous Post

जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची,कान्हेरी सरप येथून मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात

Next Post

महाराष्ट्रात कोरोनाची स्‍थिती गंभीर! राष्ट्रपती राजवट लागू करा : खा. नवनीत राणा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
नवनीत राणा

महाराष्ट्रात कोरोनाची स्‍थिती गंभीर! राष्ट्रपती राजवट लागू करा : खा. नवनीत राणा

बेरोजगार

ब्रेकिंग न्यूज बेरोजगारांना मोठा दिलासा : राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.