• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दाऊदच्या नावाने मुख्यमंत्र्यांना धमकी देणार्‍याला अटक

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 13, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
अटक
23
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई :

दुबईहून दाऊद इब्राहिमच्या नावाने राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पलाश नरेंद्रनाथ बोस (वय 49) याला ‘एटीएस’ने अटक केली आहे. तो सायन्स पदवीधर असून, त्याची पत्नी शिक्षिका आहे. गेल्या 19 वर्षांपासून दुबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास होता, त्याच्या वास्तव्याची आता महाराष्ट्र ‘एटीएस’कडून चौकशी सुरू आहे.त्याच्याकडून जप्त केलेला लॅपटॉप, मोबाईलमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

पलाशने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याची कबुली दिल्याचे जुहू एटीएसप्रमुख, पोलिस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. त्याला रविवारी शिवडीतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तो दाऊद इब्राहिमचा सहकारी बोलत आहे. दाऊदला उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायचे आहे, असा कॉल केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबईहून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होता. हे धमक्यांचे सत्र सुरू असतानाच संजय राऊत यांना व्हिडीओ कॉलद्वारे धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल क्रमांक पलाशकडे होते.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी राज्य शासनाकडून होणारा हस्तक्षेप थांबवा नाही तर परिणाम वाईट होतील, अशी धमकीच या अज्ञात व्यक्तीने संजय राऊत यांना दिली होती. त्याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आलेल्या धमकीनंतर महाराष्ट्र एटीएसने त्याचा समांतर तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान ते सर्व कॉल कोलकाता येथून येत असल्याचे उघडकीस आले.

पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने कोलकाता येथून पलाश बोस या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संजय राऊत यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनाही अशाच प्रकारे दाऊदच्या नावाने धमकी दिल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल, एक लॅपटॉप, एक भारतीय सिमकार्ड, तीन दुबईतील सिमकार्ड जप्त केले आहेत. लॅपटॉप आणि मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. पलाश हा कोलकाता येथील टॉलियंग, लेन क्रमांक तीन, येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता. तो विज्ञान शाखेचा पदवीधर असून, नोकरीनिमित्त तो गेल्या 19 वर्षांपासून दुबईत होता. काही महिन्यांपूर्वीच तो दुबईहून कोलकाता येथे आला होता.

त्याची पत्नी शिक्षिका असून, दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. सुशांत प्रकरणात होणार्‍या हस्तक्षेपामुळे त्याने या राजकीय नेत्यांना धमकी दिल्याचे बोलले जाते. धमकी देताना तो दाऊदचा उल्लेख करीत होता, दुबईत वास्तव्यास असल्याने त्याचे दाऊदशी तसेच त्याच्या कुठल्या सहकार्‍याशी संबंध आला आहे का, त्याच्या गुन्हेगारी धाग्यादोर्‍यांबाबतही आता पोलिस तपास करीत आहेत. सोशल साईटवरून त्याने काही राजकीय नेत्यांचे मोबाईल तसेच त्यांच्या निवासातील क्रमांक मिळविले होते, त्यानंतर एका अ‍ॅपच्या माध्यमातून तो धमकी देत होता.

Tags: अटक
Previous Post

होम आयसोलेशन रुग्णांनी घरातच राहावे

Next Post

मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नका

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नका

बालगुन्हे

जिल्हा विधीसेवा प्राधीकरण तर्फे बालगुन्हेगारी विषयी चर्चा सत्र संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.