मुंबई :
शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा आज, मंगळवारी करण्यात आली. त्यांच्या निवडणुकीवेळी भाजपनं सभात्याग केला.
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांचा अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीदरम्यान भाजपनं सभात्याग केला. यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.