तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालय सत्र 2020 ते 2021 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू असून तेल्हारा तालुक्यातील विद्यार्थ्यांना साठी सर्व सोयी उपयुक्त हे महाविद्यालय असून या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी
मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश सादर केले आहेत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने विद्यार्थी अजूनही प्रवेश वंचित असल्याने महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रममध्ये प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी युवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या महाविद्यालयातील प्रवेश प्रकिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली असून लॉक डाऊन मुळे खेड्यापाड्यातील बहुतांश संख्येने प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता आला नाही .
डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालय येथे ११ , बी ए , बि कॉम , बि.एस सी, करिता मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल असतो यावर्षी सुद्धा ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक अभ्यासक्रम साठी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केले आहे परंतु अजूनही मोठ्या संख्येने इयत्ता ११ , बी ए , बि कॉम , बि.एस सी , आपल्या करीता प्रवेश साठी वंचित राहिले आहेत त्यात च बऱ्याच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून लॉक डाऊन व ऑनलाईन अर्जसादर न करू शकल्यामुळे प्रवेश प्रक्रिये पासून वंचित आहे अश्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पर्यायी मार्ग काढून त्यांना प्रवेश देण्यात यावा . याकरिता युवसेनेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले यावेळी युवासेना महाविद्यालय प्रमुख वैभव देशमुख,
मयूर शेंगोकार, पवन पाटील गाढे, रोशन काळे, प्रतीक पिवाल, ऋषी केश बहकार, अभिजित आसरे, दत्ता ढोले, वैभव धरमकर, कान्हा नेमाडे, आशुतोष वाघ, अमर ओलोकार, अंकुश बुरघाटे, वैभव गावंडे,अमित घोडेस्वार,यांच्या सह युवसैनिक उपस्थित होते.