अकोला (प्रतिनिधी)- स्थानिय वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय अकोला येथे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व स्विकारुन माणिक अशोकराव शेळके यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करण्यात आला.
माणिक शेळके यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला.
माणिक अशोकराव शेळके हे कॉंग्रेस सेवा दल यंग ब्रिगेड ,अकोला जिल्हाध्यक्ष असून विदर्भ अध्यक्ष : किसान क्रांती सेना
जिल्हाध्यक्ष : राष्ट्रीय ओबीसी महासंघ
जिल्हाध्यक्ष : संत तुकाराम सामाजिक विकास परिषद
अध्यक्ष : अ.भा. कुणबी युवामंच संघटना
सदस्य : कुणबी समाज सेवा समिती, अकोला
सचिव: विदर्भ युथ फोरम, विदर्भ
तालुका अध्यक्ष : अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज. आश्रम मोझरी.अशी सामाजिक पार्श्वभूमी आहे,
पक्ष प्रवेश वेळी अॅड नरेंद्र बेलसरे गजानन गवई,गजानन दांडगे,शंकरराव इंगळे(पुर्व महानगर अध्यक्ष), सचिन शिराळे (जिल्हा प्रसिध्दी प्रमुख),महेंद्र डोंगरे,सुरेंद्र तेलगोटे,विकास सदांशिव,सैय्यद जानीभाई, मनोहर बनसोड, किशोर ठाकरे, प्रभाकर अवचार, रोहित वाघमारे, गौतम वाघमारे, शंकरराव इंगोले, गौतम धर्मानंद डोंगरे, विशाल गवई,पंकज दामोदर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.