तेल्हारा ( प्रतिनिधी): हिवरखेड येथिल 30 वर्षीय दिव्यांग महिलेवर घडलेल्या अत्याचार ची माहिती मीडिया च्या माध्यमातून भाजपच्या राज्य महीला आघाडी मिळाली असता राज्य कार्यकारिणी ने दखल घेऊन हिवरखेड येथील दिव्यांग पीडित महिलेची भेट घेऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. शासनाकडे त्या आरोपिला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे
भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष उमा खापरे यांना याविषयी माहिती मिळाली असता त्यांनी राज्य उपाध्यक्ष नयना मनतकार यांना फोन करून पीडित महिलेची भेट घ्या अशी सूचना करून माहिती घेतली त्यावर भाजपा महिला आघाडी च्या वतीने नयना मनतकार यांनी हिवरखेड येथे जाऊन पीडित महिलेला धीर देत सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन त्याकरीता प्रकिया सुध्दा सुरू केली आहे तसेच पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी महिला आघाडी मोर्चा प्रयत्न करेल महाआघाडी ची सरकार च्या काळात अपंग महिला सुद्धा सुरक्षित नाहीत त्यामुळे समाजातील अशा विकृत प्रवृत्ती च्या आरोपीला शासनाने अशी कठोर शिक्षा द्यावी की जेणेकरून पुन्हा अशा घटना करण्याचे धाडस कुणी करणार नाही अशी मागणी महिला आघाडी ने शासनाकडे केली आहे यावेळी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ कुमुमताई भगत तालूका भाजपाचे अध्यक्ष गजानन ऊबंरकार महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ मोनिकाताई वाघ अनिल कराळे जिल्हा दिव्यांग विकासआघाडीचे बाळासाहेब नेरकर केशव कोरडे,राजेश बूरघाटे गजानन राठोड शहर भाजपाध्यक्ष प्रवीण येऊल यांची उपस्थिती होती