कोरोना अलर्ट
आज शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२१८
पॉझिटीव्ह- ८१
निगेटीव्ह-१३७
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ८१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३१ महिला व ५० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ३८ जण तांदळी येथील, पिंजर येथील १२ जण, भटवाडी बु. येथील पाच जण, कौलखेड येथील चार जण, केशव नगर येथील तीन जण, गोरक्षण रोड, लहान उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित मंगरुळ, बाळापूर, मालेगाव बाजार, रेणूका नगर, जूने खेतान, राजपूतपुरा, टिळक वाडी, पंचगव्हाण, अमानखॉ प्लॉट, रवि नगर, भारती प्लॉट, रामनगर व बेलूरा ता. पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात कापसी तलाव, ता. पातुर येथील ७३ वर्षीय महिला असून ती २ सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला तर मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून तो २ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३५६८+७८७+९४=४४४९
मयत-१६५
डिस्चार्ज- ३३७४
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-९१०
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!