अकोट(देवानंद खिरकर) -आकोट तहसील कार्यालय येथे परीट धोबी समाजाचे आरक्षण मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.संपूर्ण भारतात पारंपरिक कपडे धुण्याचा व्यवसाय करणारे आणी धर्माने हिंदू असणारा धोबी परीट समाज अत्यंत गरीब आहे.आपले कपडे प्रेस करून व कपडे धुवून तसेच मजुरी करून हा समाज आपला घरसंसार चालत आहे.परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही राजकीय पक्षांनी किंवा शासनाने या समाजाला आरक्षण देवुन न्याय मिळवून दिला नाही.फक्त आश्वासन देऊन निघून जातात पण या समाजाकडे शासनाने पाठ फिरवलेली दिसत आहे.फक्त निवडणूक आली कि सर्वांना या समाजाची आठवण येते नंतर मात्र कोणताही राजकीय पक्ष किंवा शासन स्तरावर या समाजा कडे दुर्लक्ष असल्याने या समाजातील गरीब विद्यार्थ्यांनां शिष्यवृत्ती किंवा कोणत्या ही योजनेचा लाभ मिळत नाही.आरक्षणाचा मुद्दा अनेक वेळा धोबी परीट समाजाने शासन दरबारी मांडला परंतु या समाजाच्या हितासाठी शासन कोणत्याही निर्णय घेतांना दिसत नसल्याने या समाजाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे संपूर्ण भारतात शासनाने गेल्या पाच ते सहा महिन्या पासुन लाँकडाउन सुरू केल्याने या समाजाचा संपूर्ण व्यवसाय बंद आहे. या मुळे आपला घरसंसार कसा चालनार अशी चिंता या समाजाला लागली आहे.परंतु शासनाने या समाजाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत केली नाही.धोबी परीट समाजाला पूर्ववत अनुसूचित जाती मध्ये समाविष्ट करावे अशा मागणीचे निवेदन आकोट तालुका परीट धोबी समाजाने सादर केले आहे.आता लाँकडाउन सुरू असल्याने हे लक्षात घेऊन फक्त पाच जनांच्या उपस्थितीत आपल्या आरक्षण मागणीचे निवेदन तहसीलदार उपविभागीय अधिकारी महसूल विभाग अकोट यांना सादर केले आहे हा समाज अंल्पसंख्यांका मध्ये असल्याने या समाजाला शासनाच्या कोणत्याही सुवीधांचा लाभ मिळत नाही.या समाजाला अणुसूचीत जाती मध्ये समाविष्ट करण्याकरीता सामाजिक न्याय विभाग नवी दिल्ली यांनी पाठवलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विहित प्रपत्रामध्ये १० महिने लोटून सुद्धा माहिती भरून न पाठवल्यामुळे शासनाच्या विरोधात तहसील कार्यालय अकोट समोर महाराष्ट्र धोबी समाज आरक्षण समन्वय समिती शाखा अकोट च्या वतीने निवेदन व अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी हे आंदोलन महाराष्ट्र समीती प्रमुख रमाकांत कदम,अध्यक्ष श्री.डी.डी. सोनटक्के कार्याध्यक्ष, राजेंद्रभाऊ खैरनार,यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी अकोट तालुका अध्यक्ष राजेंद्र माऊलकर,संजय गवळी पत्रकार आशिष वैतकार,मंगेश निंबाळकर, गणेश डायलकर,नरेंद्र नेरकर,अनंता मोंडोकार,दिलीप मावलकर,सोनु नेरकर,अक्षय उमक,गजानन बेलुरकर,यांच्यासह महाराष्ट्र धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आकोट व तालुक्यातील धोबी परीट समाज बांधव उपस्थित होते. शासनाच्या नियमांचे पालन करून पार पडला हा कार्यक्रम तरी शासनाने या धोबी परीट समाजाची आरक्षणाची मागणी लवकरात लवकर मान्य करुन या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने पाऊले उचलावी अशी मागणी होत आहे.