• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आता ७/१२ वर असणार प्रत्येक गावाचा युनिक कोड,वॉटर मार्क आणि शासनाचा लोगो

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 4, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
81 1
0
युनिक कोड
13
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ब्रिटीश काळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये १९४१ मध्ये एम.जे.देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या.त्यानंतर जवळपास ८ दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत असून सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात आले आहेत.यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर ७ अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

गाव नमुना नंबर ७ मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही मात्र आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरसमीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील. सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

Tags: क्यूआर कोडयुनिक कोडवॉटर मार्क
Previous Post

तेल्हारा हिवरखेड रस्ते चे काम करणाऱ्या सुधीर कंट्रक्शन वर गुन्हे दाखल करा,शिवाय ग्रुप ची मागणी

Next Post

पुणे भिडेवाडा येथील मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक जाहीर करा,माळी युवक संघटनेची मागणी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
राष्ट्रीय स्मारक

पुणे भिडेवाडा येथील मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक जाहीर करा,माळी युवक संघटनेची मागणी

प्रतिकारकशक्ती

रोग प्रतिकारकशक्ती वाढविणे हाच कोरोनावर उपाय-डॉ. सुजाता मुलमुले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.