म्हैसांग(निखिल देशमुख) – म्हैसांग येथे दोन दिवसात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासन आता सज्ज झाले आहे.अकोला शिवसेना उप जिल्हाप्रमुख व गटनेता तथा जि.प.सदस्य गोपाल दातकर यांनी गावाला भेट देऊन आरोग्य विभागाची बैठक घेतली व नागरिकाना स्वताची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील गोपाल दातकर यांच्या दहिहांडा जि .प.सर्कल मधील म्हैसाग या गावामध्ये दोन दिवसात दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे गावातील नागरिकाच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते.त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी आज सकाळी गावाला भेट देऊन लोकांच्या सोबत संवाद साधून त्याचा मनातील भीती दूर केली.यावेळी नागरिक ज्ञानेश्वरराव गावंडे,नारारण भाऊ मावळे,सचिन गावंडे,गोपाल नवलकार,संतोष पीपरे,दिपक पाटील,निखिल देशमुख यांच्या उपस्थितीत आरोग्य उपकेद्र येथे आढावा बैठक घेऊन तात्कळ गावातील कोरोना पॉझिटीव्ह पेशन्ट आढळले त्या परिसरातील सर्व घराची तपासनी व फवारणी करण्याचे आदेश दिले,हि तपासनी व फवारणी स्वतः हजर राहून करुन घेतली.