तेल्हारा(प्रतिनिधी)- सर्व जाती धर्माचे धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तेल्हारा शहरात महाभकास आघाडी सरकारच्या विरोधात घंटा नाद करून जाहीर निषेध करण्यात आला.
या अनुशंगाने तेल्हारा येथे गणेश मंदिर या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा तेल्हारा शहर च्या वतीने घंटा वाजऊन महाभकास आघाडीचा जाहीर निषेध केला या वेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष लखन राजनकार यांच्या नेतूत्वांत भाजयुमो शहर गणेश इंगोले ,शहर सरचिटणीस अनिकेत ढवळे, दीपक मोडक, शहर उपाध्यक्ष ,मनोज पालिवाल, सोनू जिंदे,संदीप नेमाडे,शिवा अमृतकार ,छोटू विखे,व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत जाहीर निषेध करण्यात आला.