अकोला – शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना संगणक ज्ञानविषयाक अहर्ता MS-CIT अभ्यास क्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे एमकेसिएलचे अधिकृत संगणक प्रशिक्षण केन्द्रे सुरु करण्यास अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
अटी व शर्ती –
कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव रोखण्याकरिता एका बंँचमधील एकूण विद्यार्थी क्षमतेच्या फक्त 50 टक्के विद्यार्थ्यांना केन्द्रामध्ये प्रवेश बंधनकारक राहील, विद्यार्थी व कर्मचारी यांची सामाजिक अंतराच्या नियमानुसार बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, केन्द्रामध्ये डिजिटल थर्मामिटर हंन्ड सॅनिटायझर,हातमोजे, व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी, केन्द्रामधील प्रत्येक व्यक्ती यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील, प्रत्येक विद्यार्थ्याचे केन्द्रामधील प्रवेशाचे वेळी सॉनटाईन करावे. साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे व कर्मचारी यांचे थर्मल स्कॅनिंग करणे अनिवार्य राहील, केन्द्राच्या परिसराचे सोडीयम हायपोक्लोराईटच्या सहायाने दैनंदिन निर्जतुकीकरण करण्यात यावे, केन्द्रातील स्वच्छतागृहाची निगा राखण्यात यावी, केन्द्रामध्ये वारंवार वापरण्यात येणा-या वस्तू उदा. दरवाजाचे कड़ी कॉडे, नॉब, हॅन्डल , बटन, बेल, टेवन, खुची व
इतर उपकरणे सोडीयम हायपोक्लोराईट चा वापर करुन स्वच्छ करुन घ्यावीत, शक्यतोवर हॅन्डग्लोव्हचा वापर करावा. प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक राहील, दोन बँचेसमध्ये अर्धातास अवकाश ठेवून प्रत्येक वेळी हॉल स्वच्छ व खुर्च्या व तदनुषांगीक बाबी सॅनिटाईज करावीत.
एकाच वाहनातून कर्मचारी व विद्यार्थी यांनी जास्त संख्येने प्रवास करु नये, एकत्र बसणे, एकत्र डबा खाने किंवा एका ठिकाणी एकत्र जमा होणे टाळावे, कोविड-19 चे संदर्भाने आरोग्य विभागाचे दुरध्वनी क्रमांक तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना दर्शनि भागात लावण्यात याव्यात, विद्यार्थ्यांच्या अथवा कर्मचा-याच्या कुटुंबात अथवा निवासस्थान परिसरात कोविड-19 चा रुग्ण नसल्याचे खात्री
करावी, कोणत्याही विद्यार्थी व कर्मचारी यांना जास्त ताप,खोकला अथवा दम लागत असल्यास तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात यावे, एखा-द्या कर्मचा-याचा किवा विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून हायरिस्क व लोरिस्क अशी यादी तयार करावी, प्रत्येक संस्थाचालकाने व सर्व विद्याथ्यांसहीत संबंधीत सर्वांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन ते कार्यान्वीत राहील या बाबत दक्षता घ्यावी, या कार्यालयाने कोविड-19 चे अनुषंगाने निर्गमित केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
वरील प्रमाणे विहीत करण्यात आलेल्या अटी व शर्ती तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांचे पालन करणे सर्व केन्द्रचालकांना बंधनकारक राहील. या बाबत काही त्रुटी आढळल्यास संबंधीत संस्था जबाबदार राहील व नियमानुसार संबंधीत संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.