मूर्तिजापुर शहरातील सरोदे प्लाट येथे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या जुगार तब्बल १४ लोकांना रंगेहात पकडले तर ४० हजारांच्यावर मुद्देमाल जप्त केला आहे.
मूर्तिजापुर शहरातील सरोदे प्लाट परिसरातील एका बंद घरात सुरु असलेल्या जुगार अड्डावर पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांचा सह पोलीस स्टाफ च्या मदतीने सरोदे प्लॉट मूर्तिजापूर हा त्याचे राहते घरात एका बंद खोलीत अवैधरीत्या विनापरवाना काही लोकांना गोळा करून ५२ ताश पत्यावर पैश्याची हारजीतवर जूगार खेळत आहेत .
अशी खात्रीदायक बातमीची माहिती मिळाली असता सरोदे प्लॉट मुर्तिजापुर येथे दिपक वानखडे याचे राहते घरात जावुन पो स्टॉफचे मदतीने रेड केली असता चौदा इसम हे दोन गटात तोंडाला मास्क न लावता एकत्र जमुन कोणतीही काळजी न घेता सिमेंटच्या फलोरिंगवर गोलाकार बसून तीन पानी परेल नावाचा जुगार पैश्याच्या हारजीतवर खेळतांना मिळुन आले.
१) दिपक मधुकर वानखडे वय ३८ वर्ष रा सरोदे प्लॉट मुर्तिजापुर
२) जनार्धन तुळशिराम इंगळे वय ५२ वर्ष रा.भिमनगर,मुर्तिजापुर
३) अमोल प्रकाश खंडारे वय २९ वर्ष रा पंचशिल वाडी,मुर्तिजापुर
४) विनोद अवदुतराव गवई वय ४३ वर्ष रा.पंचशिल वाडी,मुर्तिजापुर
५) भुषण साहेबराव खंडारे वय ३५ वर्ष रा.पंचशिल वाडी,मुर्तिजापुर
६) दिनेश सुखदेव इंगळे वय ३३ वर्ष रा.पंचशिल वाडी,मुर्तिजापुर
७)गजानन शंकरराव वानखडे वय ३१ वर्ष रा.पंचशिल वाडी मुर्तिजापुर
८) अब्दुल जसीम अब्दुल कलीम वय ३२ वर्ष रा.सरोदे प्लॉट मुर्तिजापुर
९) अविनाश जनार्धन भगत वय २६ वर्ष रा.पंचशिल वाडी मुर्तिजापुर
१०) प्रशांत मधुकर वानखडे वय ३१ वर्ष रा.सरोदे प्लॉट मुर्तिजापुर
११) धनंजय मणिकराव तेलगोटे वय ३५ वर्ष रा.पंचशिल वाडी मुर्तिजापुर
१२) स्वप्निल मधुकर वानखडे वय २५ वर्ष रा सरोदे प्लॉट मुर्तिजापुर
१३) संजय जवाहरलाल गुप्ता वय ४९ वर्ष रा हलवाईपुरा मुर्तिजापुर
१४) विनोद मणिकराव तेलगोटे वय ४० वर्ष रा पंचशिल वाडी मुर्तिजापुर
सर्व आरोपींना मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन ला आणले असता त्यांच्यावर भादंवी कलम १८८,२६९ सहकलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधीनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार शैलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, दिपक इंगळे, पोलीस कर्मचारी श्याम मोहळे, सागर आकोटकर, प्रियंका धोटे यांनी केली.