अकोला – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली१२ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र डफळे बजाव आंदोलन केले होते.आगामी काळात एसटी सेवा सुरू न केल्यास वंचीत पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना घेऊन पून्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे सरकारने तातडीने एसटी सेवा सुरू केली.आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी ह्यांनी नवीन आणि जुने बस स्थानक येथील एसटी बसेस च्या वाहक चालकांचा सत्कार करीत एसटी मध्ये प्रवास केला.
डफळे बजाव आंदोलनाला भरभरून यश मिळाले.त्याने हादरलेल्या सरकारने तातडीने पाऊले उचलत गरीब जनतेला व सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. या पुढे ही महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्येला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व समस्येवर सहकार्य करण्याचे अभिवचन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरुंधतीताई सिरसाट आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक यांनी दिले.ह्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी एस टी मध्ये प्रवास यात्रा करून गाडीचे शेषराव डोंगरे, जुमळे चालक यांची शाल व टोपी घालून सत्कार केला.तसेच कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता शासनाने कोरोना रोग प्रतिबंधा करिता योजिलेले नियम पालन करत आपल्याला प्रवासाला सुरुवात करावी जनतेला आव्हान केले आहे.
या एस टी प्रवासावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरून्धतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, दिपक गवई, वंदनाताई वासनिक, प्रतिभाताई अवचार ,गजानन दांडगे, सुरेंद्र तेलगोटे,सम्राट सुरवाडे,रामाभाऊ तायडे, गजानन गवई,मंतोषताई मोहोड, प्रितीताई भगत, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,पं स सदस्य किसन सोळंके,मोहन तायडे,शंकर राजुस्कर, राजेश तायडे, गजानन साठे हया सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवास केला