अकोला – जिल्ह्यातील परपंरागत असलेल्या राजराजेश्वराची पालखी व कावड यात्रा श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी काढण्यात येते. हजारोच्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पुर्णा नदीतून कावडव्दारे जल आणून राजराजेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात.
परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीनीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार तसेच जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार शिवभक्तांनी कावड यात्रेस मानाची एक पालखी काढून, मर्यादित संख्या व सामाजिक अंतर राखून प्रतिसाद दिला त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शिवभक्तांसह जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानले आहे. यापुढेही जिल्ह्यातील नागरिकांनी अशाच प्रकारचे सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.