मुर्तिजापुर (सुमित सोनोने)- – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत लंघापूर 57 खेडी योजना चे पाणी एक वर्षापासून मोझर येथील पाण्याच्या टाकीत पोहलेच नाही.परंतु पाईपलाईन दुरुस्ती चे देयक मात्र काढण्यात आले असल्याने या कामात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून दोषी वर कार्यवाही करावी.
57 खेडी लंघापुर पाणी पुरवठा योजनेमध्ये गाव समाविष्ट असून बऱ्याच दिवसापासून गावातील पाणी पुरवठा बंद आहे.या बाबत अभियंता एन.ए.खान यांना तोंडी विचारणा केली असता आराखडा तयार करून मोझर गावाला पाणी मिळेल असे आश्वासीत केले होते. मात्र अद्यापही मोझर येथील पाण्याची टाकी कोरडी आहे.पाईपलाईन चे थातूरमातूर काम करुन देयक सुद्धा काढण्यात आल्याचे व सदर कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय काकड मोझर हे ११ ऑगस्ट पासून उपोषणाला बसले आहे.