अकोला (प्रतिनिधी)- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखविणारा एक संदेश अकोला येथील कार्मेल शाळेच्या सुनिता जोसेफ नामक शिक्षिकेने व्हॉटसअप वर टाकला असून कार्मेलच्या वर्ग ६ अ च्या विद्यार्थ्यांना तो पाठवला हिंदू धर्मिय विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावना दुखावणारी ही पोस्ट काल ६.५६ मिनिटांनी पाठवली
या अत्यंत घृणित प्रकाराबाबत शिक्षिका सुनिता जोसेफ हिने पोस्ट केल्याची माहिती काही पालकांना कळाली त्या नंतर काही पालकांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून हा प्रकार सांगितला त्यानंतर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माउंट कार्मेल या शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला.
त्यानंतर त्यांनी सारवासारव करत माफी मागितली आणि सुनीता जोशेफ या शिक्षकाकडून लेखी माफीनामा घेतला आणि शाळा प्रशासनाने युवासेनेच्या नावाने एक पत्र देऊन जाहीर माफी मागितली. या वेळी युवा सेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील उपजिल्हाप्रमुख योगेश जी बुंदेले शहर प्रमुख नितीन जी मिश्रा उपशहर प्रमुख विकीसिंग बावरी, अक्षय वानखडे, अजय दुबे व युवासैनिक उपस्थित होते.










