अकोला,दि.31 (जिमाका)- वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेतर्गत दि. 30 सप्टेंबर पर्यंत एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेत.
गुरुवार (दि.30) रोजी नियोजन भवनात एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम राबविण्याकरिता नियोजन करण्यासाठी आढावा घेण्यात आला. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विजय माने, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडके, वृक्ष मित्र ए. एस. नाथन यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक शाळेत शिक्षकांनी पुढाकार घेवून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक वृक्ष लावण्यात यावा. यासाठी वृक्ष सामाजिक वनीकरण विभागाकडून मिळतील. सदर वृक्ष विद्यार्थ्याने लावून त्यांचे संगोपन करावे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षा बद्दल प्रेम निर्माण होवून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.