अकोला– सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात 10 वी , 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष 60 टक्के पेक्षा जास्त प्राविण्याने गुणवत्ता मिळवुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थ्यांना महामंडळाकडुन जेष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहुन मुख्यालय, मुंबईव्दारा अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याकरीता पात्र विद्यार्थ्यांनी पुढील कागद पत्रांची पुर्तता करुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, आरोग्य नगर चौक, नालंदा नगरच्या बोर्डाजवळ, कौलखेड रोड, अकोला, येथे कार्यालयीन वेळेत सोमवार दि. 10 ऑगस्ट पर्यंत संपर्क साधावा. यानंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागद पत्रे जातीचा दाखला, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, रेशन कार्ड अथवा आधार कार्ड, दोन फोटो, पुढिल वर्गात प्रवेश घेतलेल्या पावतीची झेरॉक्स अथवा बोनाफाईट इत्यादीची आवश्यकता आहे, असे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.