• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

डीआरडीओ ने लेह इथल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च संस्थेमध्ये कोविड-19 ची चाचणी सुविधा सुरू केली

Team by Team
July 24, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
डीआरडीओ
13
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

संरक्षण संशोधन व विकास संस्था डीआरडीओ(DRDO) ने लेह मधल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च (दिहार) येथे कोविड-19 ची चाचणी सुविधा सुरू केली आहे. लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी तसेच बाधित रुग्णांच्या देखरेखीसाठी या सुविधेचा उपयोग होईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची(ICMR) सुरक्षा मानके तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे या चाचणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्‌घाटन 22 जुलै 2020 रोजी नायब राज्यपाल आर के माथूर यांच्या हस्ते करण्यात आले.

दिहार इथले हे केंद्र प्रतिदिन 50 नमुन्यांच्या तपासण्या करण्यास सक्षम आहे. कोविड चाचण्या करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी देखील या केंद्राचा उपयोग करता येईल. भविष्यकाळात उद्‌भवू शकणाऱ्या अशा प्रकारच्या साथींशी मुकाबला करण्यासाठी तसेच शेती किंवा जनावरांच्या रोगांवर संशोधन करण्यासाठीही या केंद्राचा उपयोग होऊ शकेल.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

कोविडशी चाललेल्या लढ्यात बजावलेल्या भूमिकेबद्दल नायब राज्यपाल आर के माथूर यांनी डीआरडीओ ची प्रशंसा केली. डीआरडीओचे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन व विकास खात्याचे सचिव डॉक्टर सतीश रेड्डी यांनी हे सुविधा केंद्र उपलब्ध करून दिल्याबद्दल नायब राज्यपालांनी त्यांचे आभार मानले. संक्रमित रुग्णांच्या उपचाराकरता या केंद्राची मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

नायब राज्यपालांनी केंद्राची पाहणी देखील केली. पर्यावरण रक्षण, आरोग्य सेवकांचे तसेच संशोधकांचे संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी या केंद्रात राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच जैव सुरक्षा धोरणाबद्दल यावेळी त्यांना माहिती देण्यात आली.

याप्रसंगी ‘दिहार’चे संचालक डॉ. ओ पी चौरसिया, कमांडंट ब्रिगेडीयर जे बी सिंग, NRISR च्या संचालक डॉ पद्मा गुरमीत, एस एन एम रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुतुम दोरजे, इतर प्रमुख सैन्याधिकारी व डीआरडीओचे शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

‘दिहार’ ही डीआरडीओच्या अनेक जैवविज्ञान प्रयोगशाळांपैकी एक असून तिथे थंड व कोरड्या हवामानातल्या कृषी व पशुधन तंत्रज्ञानावर संशोधनाचे काम चालते. या प्रयोगशाळेत औषधी तसेच सुगंधी वनस्पतींचा शोध घेतला जातो व त्यांचा उपयोग संरक्षण विषयक उपकरणांमध्ये करून घेण्याविषयी संशोधन केले जाते. याशिवाय तिथे अतिउच्च पातळीवरच्या हवामानात व थंड वाळवंटी प्रदेशात वापरल्या जाणाऱ्या हरितगृह तंत्रज्ञानावरही संशोधन केले जाते.

Tags: चाचणीडीआरडीओदिहार
Previous Post

आयपीएल २०२० ची फायनल केव्हा अन केव्हा जाणार UAE भारतीय संघ

Next Post

एका दिवसात सुमारे 30,000 रुग्ण बरे झाले, एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा, एकूण बरे झालेले रुग्ण 7.82 लाखाहून अधिक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
रुग्ण

एका दिवसात सुमारे 30,000 रुग्ण बरे झाले, एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा, एकूण बरे झालेले रुग्ण 7.82 लाखाहून अधिक

एम.एस.एम.ई.

एम.एस.एम.ई. क्षेत्रातील कृषी क्लस्टर डेव्हलपमेंट या विषयावरील वेबीनारद्वारे साधला फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांशी संवाद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.