अकोट (देवानंद खिरकर)- सद्या अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे संपुर्ण लॉकडाऊन सुरु असल्याने रस्ते ओसाड पडले आहे.अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील वाहतुक यंत्रणा ही पूर्णपणे ठप्प पडलेली आहे.अशा बिकट परिस्थिती मधे अकोट शहरातील एका खाजगी हॉस्पिटल मधे काम करुन घराकडे परत जात असलेली युवती वाहतुक बंद असल्यामुळे अडकून पडली होती.ती घरी जाण्याच्या आशेसाठी ही युवती ग्रामीण पोलिस स्टेशन समोर उभी असल्याचे ग्रामीणचे ठाणेदार फड साहेब यांना दिसली.त्या युवतीची व्यथा येकल्यावर ठाणेदार फड साहेब यांनी संध्याकाळची वेळ असल्याने तिला तात्काळ पोलिसांच्या गाडीने बसवून तिला तिच्या अकोलखेड या गावी घरी सुखरुप पोहचविण्यात आले. त्यामुळे युवती,तिचे कुटुंब,आणि संपुर्ण गावकर्यांनि ठाणेदार फड साहेब यांचे कौतूक केले.केवळ दंडुके,दंडात्मक कारवाया,नाही तर खाकी वर्दी मधे सुध्दा ठाणेदार फड साहेब यांच्या सारखे माणूसकी जपत असुन संकटकाळातील समाजाकरिता पोलिस कटीबध्द असल्याचे अनुभवता आहे.