अकोट (देवानंद खिरकर)- कोरोनाचे नावं घेवून महाराष्ट्र सरकारने वारकर्यांचे भजन कीर्तन बंद केलेले आहे.आणि आषाढी वारीला दि ६/७/२०२० ला संत नामदेव महाराजांच्या वंशजांनी परंपरेनुसार नामदेव महाराज पायरीजवळ काला केला असता त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी दि.३०/७/२०२० ला पंढरपूर ला नामदेव पायरी जवळ आमरण उपोषणाला बसणार आहेत. महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे संतांच्या भूमीमध्ये भजन कीर्तन करण्याकरिता सरकारने किमान ५० भाविकांना परवानगी द्यावी.या आशयाचे कितीतरी पत्र आम्ही सरकारला पाठविले आहे.पण त्याचे सरकारकडून एकही प्रत्युत्तर न आल्यामुळे सरकारला वाराकार्यांविषयी किती आपुलकी आहे हे आम्हाला कळून आले आहे. आणि आषाढी वारीमध्ये पौर्णिमेच्या दिवसाला संत नामदेव महाराजांच्या वंशजांनी नामदेव पायरीजवळ अगदी २० ते २५ भाविकांसोबत परंपरा खंडित होवू नये याकरिता नियमाने कला करून दिंडी सोहळा काढला असता संत नामदेव महाराज पुण्यातीथीच्या आधल्या दिवशीच नामदास महाराज आणि हरिदासजि महाराज याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.यामुळे संत परंपरेचा फार मोठा अपमान झाला आहे.आणि झी मराठी वाहिनीवरील फु बाई फु या कार्याक्रामध्ये ज्या कलाकारांनी संताचा अपमान केला त्याच्याविषयी तक्रार दहीहांड़ा पोलीस स्टेशनमध्ये मध्ये दाखल करूनही गुन्हे दाखल होत नाहीत.यामध्ये कुठेतरी राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने आणि महाराष्ट्रातील इतरही संघटनां आमच्या सोबत आमरण उपोषणाला बसणार आहेत.आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
(1)संत नामदेव महाराज यांच्या वंशाजांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी तो गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा.
(2 )सध्या सरकारने देशी दारूचे दुकानाला परवानागिया आहे मॉलला परवानगी आहे आणि चित्रपट सृष्टीला व्हिडिओ शुटींग ला परवानगी आहे. आणि आता आपण गणेशोत्सवमध्ये भजन कीर्तनाला परवानगी दिली पण श्रावण महिन्यामध्ये गावोगावी धार्मिक ग्रंथाचे वाचन असते आणि वारकर्यांच्या पाच महापर्वकाळांमध्ये गोकुळअष्टमी हा महापर्वकाळ आहे म्हणून श्रावण महिन्यातील गोकुळअष्टमी पासून अखंडितपणे महाराष्ट्रातील वारकर्यांना किमान ५० भाविकांना नियम व अटी लावून भजन कीर्तन करण्यास परवानगी देण्यात यावी. हि परवानगी पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात न जाता गावातील पोलीस पाटील व सरपंच यांच्याकडून मिळण्यात यावी. (जो जिल्हा रेड झोनमध्ये आहे त्या जिल्ह्याकरिता आमचा आग्रह नाही पण रेड झोन जिल्ह्यातील ग्रामीण भगत कोरोनाचा प्रादुर्भाव नसेल तर त्या भागामध्ये भजन कीर्तनास परवानगी देण्यास हरकत नाही)
(३)झी मराठी या वाहिनीवरील फु बाई फु या कार्याक्रामध्ये निलेश साबळे ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत यांनी कीर्तन परंपरेचा व फडकरी परंपरेचा अश्लील भाषेत वापर करून बुद्धीपुरस्कर अपमान केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केलेली आहे.पण अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही पोलीस प्रशासन संत मंडळीवर त्वरित गुन्हे दाखल करीत आहे पण ज्यांनी वारकरी परंपरेचा अपमान केला अशा फु बाई फु कार्यामातील नायक नायीकेवर गुन्हे दाखल करण्यासाठी विलंब लावत आहेत.तरी त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा .