अकोला (योगेश नायकवाडे) श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रभुषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली आद्यसंत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सप्ताह निमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य आपणासाठी राज्यस्तरीय चित्रकला, मूर्ती,कॅलिग्राफी, स्केच, डिजीटल चित्रकला स्पर्धांचे आयोजन केलेले आहे
रविवार दि.१९ जुलै २०२० रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत आद्यसंत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी आहे.त्या निमित्त राज्यस्तरीय चित्रकला, मूर्ती, स्केच,डिजीटल चित्रकला, कॅलिग्राफी स्पर्धा कार्यक्रम आयोजित केला आहे.
आपण तयार केलेली श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे प्रसंगावर आधारित चित्र,मूर्ती, डिजीटल फोटो ,कॅलीग्राफी ,स्केच हे pdf स्वरूपात [email protected] या मेल आय डी वर १५ ऑगस्ट २०२० पर्यंत पाठवावा व सोबत स्पर्धकांचे नाव पत्ता मो.न.सह स्पर्धकांची संपूर्ण माहीती पाठवावी.
आपण काढलेले श्री संत सावता महाराज यांचे प्रसंगावर आधारित चित्र, साकारलेली मूर्ती, डिजीटल चित्र सगळ्या पेक्षा उकृष्ठ असेल अश्या स्पर्धक यांना प्रथम, द्वितीय, तृतीय प्राप्त स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे नियम हे श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या हाती असतील. कोणीही चित्रकला, मूर्ती, डिझिटल चित्र पाठवू शकतात. या स्पर्धेसाठी वयाची कुठलीही अट नाही. सदर स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
१) प्रथम पारीतोषीक- रोख रक्कम २१,१११/-
सन्मानपत्र,आदि
२) द्वितीय पारीतोषीक – रोख रक्कम ११,१११/-
सन्मानपत्र
३) तृतीय पारीतोषीक- रोख रक्कम ५५५५/-
सन्मानपत्र
सहभागी प्रत्येक स्पर्धकांना सन्मापत्र देण्यात येनार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
• कैलासराव शिंंदे करजगावकर
– 9503992740,
• समाधान माळी सर
– 9834436587,
• प्रसाद शिंदे
– 9075161219.
•अजयदादा बंड {अकोला}
-8109482791, 7470704557
सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील तमाम कलाशिक्षक, डिझायनर, घरघुती कलाकार, आदी पुरुष व महिलांनी ईच्छुकांनी जास्तीत जास्त संखेने सहभाग नोंदवावा,असे आवाहन संघाचे राज्य कार्याध्यक्ष कैलासराव शिंदे यांनी केले आहे.
टीप:- आपण साकारलेले चित्र, मूर्ती व डिजीटल फोटो हे pdf स्वरूपात दिनांक १५ ऑगस्ट २०२० पर्यंत खालील मेल आय डी वर पाठवावा.
[email protected]
👉 सदर स्पर्धेचे महत्त्व संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेस पटवुन द्यावे.
तसेच अकोला जिल्हा साठी अजयदादा बंड यांच्याशी संपर्क करावा.