अकोला (प्रतिनिधी)- जिल्हाभरामध्ये शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन बियाण्यापैकी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. याप्रकरणी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.
अकोला जिल्ह्यात बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी सोयाबीन चे पीक दरवर्षी घेतात. सोयाबीन पट्टा म्हणून ओळखल्या जाणार्या अकोला जिल्ह्यात यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु यावर्षी असंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे बियाण्याच्या खर्चासह खते, पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च वाया गेला. शिवाय अनेक शेतकऱ्यांचा खरिपाचा हंगाम हातातून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात मंगळवार 14 जुलै रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री वाघमारे यांना परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. ज्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही, त्या कंपन्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांनी केली. सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात कारवाई करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी वेळकाढूपणा करीत आहेत, शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच पिक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या बाबतीतही शेतकऱ्यांची कृषी विभागाच्या विविध कार्यालयांमधून अडवणूक केली जात आहे. या सर्व बाबतीत जिल्हाभरातील कृषी विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या तक्रारींचे ताबडतोब निरसन करण्याचे निर्देश देण्यात यावे, असेही जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे व शिवाभाऊ मोहोड यांनी यावेळी श्री वाघमारे यांना सांगितले.
तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फक्त बियाण्यांच्या खर्चाची नव्हे तर खते, पेरणीचा खर्च, मशागतीचा खर्च यासह त्याच्या उत्पादनाचे झालेले नुकसान हा सर्व खर्च नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावा. या मागणीसह येत्या आठवडाभरात सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळण्यासह शेतकऱ्यांच्या इतर सर्व समस्या सोडविल्या गेल्या नाहीत तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रुमणे मारो आंदोलन जिल्हा अध्यक्ष संग्राम भैयया गावंडे याच्या मार्गदर्शनात करेल. असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांनी यावेळी दिला.
सोयाबीन पेरण्यासाठी काय काय खर्च लागतो, हे अधिकाऱ्यांना पटवून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात यावेळी ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी अधिकाऱ्यांना करून दाखविण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव म्हैसने,सरचिटणीस परीमल लहाने ,राष्ट्रवादी युवक चे पधादीकारी करण दौंड ,अनंत पाचबोले,नरेंद्र घोम, विक्की लाखे, ज्ञानेश्वर ताले, बाळासाहेब तायडे, श्रीराम ताले, प्रथमेश देशमुख, संकेत कुऱ्हे, सागर मोहोड, गोपाल ताले, सुमित तवाडे, ऋषिकेश वाघमारे, शुभम हेमने, सौरभ मुरकुटे, ऋषिकेश मुरकुटे, मो.साबीर मो. फजलू, मोहम्मद फजलू पहेलवान, महेश मोरे, कौस्तुभ देशमुख, शिवा साबळे, धीरज सरदार, प्रद्युम्न लोणकर, गौरव मते, अनंत पाचबोले, मंगेश मागटे रामहरी आगळे, गजानन पातोंड, भारत ढाकोलकर, सुनील डाबेराव, अमोल निखाडे, सुनील निलखन यांचेसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासह इतर सर्व समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्याचे आश्वासन यावेळी प्रभारी कृषी अधीक्षक श्री वाघमारे यांनी दिले.अशी माहीती जिल्हा प्रसिध्द प्रमुख मोहन शेळके यांनी दीली