अकोला (प्रतिनिधी)- जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील शेतात तसेच शेत गोदामातील धान्य साठा चोरून नेणाऱ्या अट्टल चोरटयांच्या टोळीला गजाआड करण्यातं अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाला यश आलंये. या टोळीतील बारा जणांना जेरबंद करण्यात आलं असून ही सर्व चोरटे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेय. दरम्यान, बोरगांव मंजू पोलिस स्टेशन हद्दितील एका धान्य गोदामातुन ११५ क्विंटल तुर, १२७ क्विंटल हरभरा, २२ क्विंटल सोयाबीनसह अन्य मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली. याचा तपास करीत असतांना या चोरट्यांना आज ताब्यात घेण्यात आले.. त्यांच्याकडून गुह्यात वापरण्यात आलेले दोन पिकअप वाहन जप्त करण्यात आल्या असून त्यांनी केलेल्या जिल्ह्यात पाच ते सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच त्यांनी आणखी बाहेरील जिल्ह्यात गुन्हे केले असावेत … आणि ते उघडकीस यावे याकरिता आज या सर्व चोरटयांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करणारेय… स्थानिक गुन्हे शाखाचे प्रमुख शैलेष सपकाळ पोलिस उपनिरीक्षक तुषार नेवारे, सागर हटवार, दत्तात्रय ढोरे संदीप काटकर, शक्ति कांबळे, किशोर सोनोने, मनोज नागमते, संदीप ताले, गीताबाई अवचार यांच्यासह आदींनी केली