कुटासा (कुशल भगत)-कुटासा जिल्हा परिषद शाळा येथील शिकस्त वर्गखोल्या पाहून व्यथित झालेले आमदार अमोल मिटकरी यांनी आज कुटासा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाषजी पवारसमवेत भेट दिली.अस्वच्छतेच्या विळख्यात असलेला शालेय परिसर सर्वांगसुंदर करण्यासाठी सोबत असलेल्या संपूर्ण टीमसोबत पाहणी केली.शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. यावेळी सुभाष पवार यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण,अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र,पोस्ट ऑफिस सर्व विभागांचा आढावा घेतला.
भारतवृक्ष क्रांती मोहिमे अंतर्गत दि.१४जुलैला संपूर्ण अकोला जिल्ह्यात निंबोळ्या रोपण करायच्या असल्याने आज आमदार अमोल मिटकरी सुभाष पवार यांच्या हस्ते पालकांना निंबोळ्या वाटप करण्यात आल्या तसेच शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.यावेळीमाजी समाजकल्याण सभापती विजयसिंह सोळंके, गटविकास अधिकारी रायबोले, गटशिक्षणाधिकारी सावरकर, साहेब,विशालराजे बोरे,शाम राऊत,इंजिनिअर अमोल पाटील,आर जे.गौरव,डॉ निलेश वानखडे, सोपान कुटाळे,केंद्रप्रमुख होपळ कोटेश्वर संस्थानचे संचालक मंडळ,सर्व शिक्षक, गावातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.