तेल्हारा (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी यांचे आदेश झुंगारून लॉक डाउन मध्ये बार मध्ये क्लब सुरू ठेऊन सर्व नियम धाब्यावर बसवून कोरोनाच्या काळात जुगार खेडणाऱ्या बारमाकासह सहा जणांना आज तेल्हारा पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.
शहरातील हिवरखेड रोडवर वर असलेल्या प्यासा बार या नावाने असलेल्या बारच्या मालकाने लॉक डाउन सुरु असताना बार मध्ये जुगार सुरु केला असता तेल्हारा पोलिसांनि धाड टाकून बार मालकासह सहा जनांना अटक केली कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरात दोन वाजेपर्यंत मार्केट उघडे ठेवून त्यानंतर सर्व शहर लॉक डाऊन ची अंमलबजावणी करून मार्केट बंद केल्या जाते. मात्र या लॉक डाउन च्या संधीचे सोने करीत बार मालकाने बार मध्ये क्लब सुरु करून जुगार अड्डा सुरु केला असता याची भनक तेल्हारा पोलिसांना लागली नंतर गुप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी रेट केली असता बार मालक रामसुख सूर्यभान ताडे रा.तेल्हारा व दिनेश बळीराम नागपुरे रा.बेलखेड ,गणेश मधुकर येणकर रा बेलखेड ,संतोष बाबन अवचार रा.बेलखेड, प्रफुल भाऊदेव खिरोडकर रा बेलखेड ,पंकज मनोहर भटकर रा बेलखेड, दीपक गजानन भड रा.बेलखेड, या आरोपींना अटक करून १ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल तेल्हारा पोलिसांनी धाड टाकून जप्त केला सदर घटना आज दिनांक १२ जुलै रोजी रात्री ८ वाजता घडली.यामध्ये विविध गुन्हे नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर कारवाई ठाणेदार विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली पी एस आय निलेश देशमुख,पो कॉ अमोल नंदाने, अरुण हिवराळे,विजय खेकडे,नागे यांनी केली.