भारतात 59 चीनी अॅपसह टीकटॉक बंद झाल्यानंतर त्याच्याच सारखे फीचर्स असणारे अनेक अॅप्स लाँच झाले आहेत. दररोज कोणता तरी एक शॉर्ट व्हिडीओ अॅप लाँच होत आहे. आता व्हिडीओ प्लेयर आणि व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरने आपला शॉर्ट व्हिडीओ अॅप टकाटक लाँच केले आहे. हे अॅप चीनी अॅप टीकटॉकची हुबेहुब नकल आहे.
टकाटकला गुगल प्ले स्टोरवरून लाँच करता येईल. हे अॅप सध्या केवळ अँड्राईड युजर्ससाठीच उपलब्ध असून, लवकरच अॅपल अॅप स्टोरवर देखील हे अॅप उपलब्ध होणार आहे.
टकाटकचे सध्या पहिले व्हर्जनच प्ले स्टोरवर असून, कंपनीचा दावा आहे की आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. प्ले स्टोरवर या अॅपला 5 पैकी 4.3 रेटिंग मिळाली आहे.
या अॅपचे इंटरफेस पुर्णपणे टीक-टॉक सारखे आहे. दरम्यान, टकाटकच्या आधी चिंगारी, रोपोसो आणि मौज सारखे अनेक शॉर्ट व्हिडीओ अॅप भारतात लाँच झाले आहेत. मेड इन इंडिया अॅप्सच्या डाऊनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे.