• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

निंबबीज व सीडबॉल रोपणाचा प्रारंभ, वृक्ष लागवड अभियानात सहभागी व्हा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Media Desk by Media Desk
July 10, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
78 1
0
tree planting akola
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१०- भारत वृक्ष क्रांती मिशन या संस्थेमार्फत जिल्ह्यात निंबवृक्ष लागवड व सीडबॉल रोपण अभियानाचा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नायगाव येथे प्रारंभ करण्यात आला. अकोला जिल्हा व शहराला पर्यावरणदृष्ट्या अत्यंत लाभदायक असलेल्या या अभियानात प्रत्येक अकोलेकरांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.

भारतवृक्ष क्रांती मिशन तर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. आज सकाळी नायगाव येथे रेल्वे मार्गाच्या दुतर्फा निंब वृक्षाचे बिज रोजण व सिड्बॉल रोपण करुन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार विजय लोखंडे तसेच भारत वृक्ष क्रांती मिशनचे ए. एस. नाथन यांची उपस्थिती होती.
यावेळी अकोला ते अकोट या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा हे बीजारोपण करण्यात येणार असून वटवृक्षाच्य्या बियांचे सीडबॉल ही दुतर्फा टाकून त्यांचे रोपण करण्यात येणार आहे. ए.एस. नाथन यांनी आजपासून अकोला येथून अकोटकडे हे बीजारोपण करीत व सिडबॉल टाकत पदयात्रा सुरु केली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी निंब वृक्षाचे बीजारोपण केले व या अभियानाला शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर निंब वृक्षाच्या बिया म्हणजेच निंबोळीचे रोपण करावे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय संस्थांनी आपापल्या परिसरात हे रोपण करुन वृक्ष लागवडीच्या या अभियानात सहभागी व्हावे. यामुळे उष्ण म्हणून गणल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्याचे तापमान नैसर्गिकरित्या नियंत्रणात आणणे भविष्यात शक्य होईल. तसेच अन्य अनेक फायदे या वृक्ष संवर्धनातून आहेत. त्यामुळे लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.
भारत वृक्ष क्रांती मिशन अंतर्गत सन २०१५ पासून अकोला जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष, एक जन्म एक वृक्ष ही वृक्षारोपणाची मोहिम राबविली. या मोहिमेला ‘अकोला पॅटर्न’ म्हणुन प्रसिद्धी मिळाली आहे. आता वृक्ष रोपणाचा एक भाग म्हणून संपुर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात निंबाच्या झाडाचे बिजांचे रोपण करण्याचा मिशनचा प्रयत्न आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

असे राबविण्यात येणार आहे अभियान

या उपक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निंबाच्या झाडाच्या बिया गोळा करुन आपआपल्या शेताच्या बांधावर ७ ते १० फुट अंतरावर दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. तसेच आपआपल्या घराजवळील परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानाच्या आजुबाजुला, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी व इतर ठिकाणी दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. गावातील नागरिक, विद्यार्थी, युवा संघटना व सामाजिक संघटना यांनी ई-क्लास जमीन, खुली जमीन, वनजमीन, डोंगराळ जमीन, रस्त्याचे आजुबाजुला व इतर पडीक जमीनीमध्ये दोन इंचाचे खड्डे करुन त्यात दोन बिया रोपण कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच शहरातील नगरपालिका यांचेमार्फत बियांचे रोपण करण्यात येईल. तथापि, हा उपक्रम राबवितांना सर्व नागरिकांनी त्यांना कोरोना संसर्ग होऊ नये, याकरिता सामाजिक अंतर पाळावे तसेच या संदर्भात यापूर्वी व वेळोवेळी निर्गमित केलेले सर्व आदेशांचे पालन करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.

असे होतील फायदे

अकोलावासियांना उन्हाळ्यात जास्त तापमानांचा सामना करावा लागतो. जर जिल्ह्यात निंबाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात रोपण झाल्यास त्यामुळे वातावरण थंड होऊन उन्हाळ्यामध्ये तापमान कमी होण्यास मदत होते. या झाडांची पान माकडे/वानरे खात असल्यामुळे माकडांकडुन शेतीतील पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल. हे झाड शेताच्या बांधावर लावल्यास त्यांचे पाने शेतात पडुन नैसर्गिक खताची निर्मीती होते. निंबाचे झाड हे औषधी वनस्पती आहे. तसेच झाडामुळे ऑक्सीजनची मात्रा वाढते तसेच प्रदुषण कमी करते.या झाडांमुळे जमीनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होते. या बीज रोपणामार्फत जी झाडे उगवतील त्यांना पाणी देण्याची आवश्यकता नाही. तसेच हे झाड उन्हाळयात हिरवेगार राहते. या झाडांचे लिंबोळी आणि पानांपासून फवारणीकरीता लिंबोळी अर्क बनविता येतो, असे अनेक फायदे या झाडाचे असल्याने या लागवड अभियानाचा साऱ्यांना फायदाच होईल,असे ए.एस. नाथन यांनी सांगितले.

Tags: वृक्ष लागवड अभियान
Previous Post

मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

Next Post

आज जिल्हयातील १३ जणांना कोरोनाची लागण,ॲक्टीव्ह रुग्ण ३८१ तर आकडा १८४१ पार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola corona updates

आज जिल्हयातील १३ जणांना कोरोनाची लागण,ॲक्टीव्ह रुग्ण ३८१ तर आकडा १८४१ पार

मूर्तिजापूर नगराध्यक्ष

मूर्तिजापूर नगराध्यक्षा स्वतः निघाल्या संभाव्य रुग्णांच्या तपासणीसाठी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.