• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान: नव्या सॉफ्टवेअरने जलद सुनावणी: ‘टेलिग्राम’वरून दररोज माहिती

Media Desk by Media Desk
July 8, 2020
in Featured, Amravati, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
78 0
0
टेलिग्राम
18
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती  : लॉकडाऊनच्या काळात राज्य माहिती आयुक्त कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. कामकाजातील सर्वात मोठा भाग असलेल्या  सुनावणी ऑनलाईन करून गती देण्यात आली आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करण्यात येत आहे. अपिलाची नोटीस ते सुनावणीसाठी नवे सॉफ्टवेअर अंगीकारून प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. या सॉफ्टवेअरच्या उपयोगामुळे येत्या काळात दररोज सुमारे 70 प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

            राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाईन कामकाजासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सहायक कक्ष अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच दोन कक्ष अधिकारी नियंत्रण करणार आहेत. ही प्रकरणे ऑनलाईन होण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती अधिकारांतर्गत संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आलेला पहिला अर्ज ते राज्य माहिती आयुक्तांकडे अपिल येण्यापर्यंत सर्व माहिती भरण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आणि ई-मेलही याच सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकरणांची निवड करून वेळी सर्व संबंधितांना एकाचवेळी नोटीस बजावणे शक्य होणार आहे. यात डाक, कागद, मनुष्यबळ यांचा कमीत कमी उपयोग होईल, त्याचबरोबर या सर्व कामासाठी लागणारा वेळी वाचणार आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

            सध्यास्थितीत राज्य माहिती आयुक्त कार्यालयात नऊ हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. एका दिवशी एक जिल्हा याप्रमाणे दररोज किमान 70 सुनावण्या घेऊन येत्या नऊ-दहा महिन्यात ही प्रकरणे निकाली निघतली. सुनावणीनंतर दिले जाणारे आदेशही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात नवीन येणारे प्रकरणेही सुनावणीसाठी घेण्यात येणार आहेत. या सॉफ्टवेअरचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी अर्जदारांनी आपला सुरवातीपासून ते राज्य माहिती आयुक्त कार्यालयापर्यंतचे सर्व अर्ज संगणकीकृत करणे गरजेचे आहे. तसेच अर्जावर भ्रमणध्वनी आणि ई-मेल आयडी लिहिणे आवश्यक आहे.

‘टेलिग्राम’वरून माहिती

जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी आणि कार्यालय प्रमुखांना माहिती अधिकाराबाबत माहिती हवी असल्यास त्यांनी माहिती आयुक्तांना संपर्क साधावा, तसेच उपयुक्त माहिती ‘टेलिग्राम’ ॲपवरून देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना https://t.me/joinchat/NIqTuBfeaP6ZRhpecjssTg या लिंकवरून ग्रुपमध्ये सामिल होता येईल.

सध्या दररोज २५ प्रकरणांची गुगल मीट ॲपवर ऑनलाईन सुनावणी घेण्यात येत आहे. मागील शुक्रवारी नागपूर येथील २५ प्रकरणांची सुनावणी घेतली आहे. अमरावती विभागातील एका दिवशी एका जिल्ह्याची ७० प्रकरणे हाताळली जातील. यासाठी नवे सॉफ्टवेअर सुरू केले आहे. सुनावणी गतीने होण्यासोबतच कार्यालय पेपरलेस होणार आहे.

– संभाजी सरकुंडे,

राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ अमरावती.

Tags: टेलिग्राम
Previous Post

विभागीय लोकशाही दिन: नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाने पाठवाव्या

Next Post

हॉटेल, गेस्‍ट हाऊस,लॉजेस सुरु करण्यास सशर्त परवानगी

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
hotels

हॉटेल, गेस्‍ट हाऊस,लॉजेस सुरु करण्यास सशर्त परवानगी

चाचणी

३७० अहवाल प्राप्त; १८ पॉझिटीव्ह, ११ डिस्चार्ज, एक मयत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.