अमरावती, दि. ८ : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतू कोविड – १९ च्या आपात्कालीन परिस्थितीमुळे या महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसल्याचे विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे. नागरिकांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनातील तक्रारी, विभागीय आयुक्त कार्यालयात पोस्टाव्दारे किंवा [email protected] – dcg [email protected] या ई मेलवर पाठवाव्या, असे आवाहन विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी केले आहे.