तेल्हारा (प्रतिनिधि)-
तेल्हारा तालुक्यातील महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी दीपक दारोकार मित्र परिवाराच्या वतीने तहसीदार तेल्हारा यांच्या मार्फ़त राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले .तालुक्यात अनेक वयोवृध्द शेतकरी असून ज्यांचे वय 80 च्या वर आहे व जे शेतकरी खाटीवरुन हलवता सुध्दा येत नाहीत एकाच जागी त्यांना सर्व सुविधा पुरववाव्या लागतात अशा शेतक – यांचे आधार कार्ड काढणे अशक्य आहे. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांचे बोटांचे ठसे उमटत नसल्याने व त्यांचे डोळे स्कॅन होत नसल्याने ब – याच वृध्दांचे आधार कार्ड निघत नाही . महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या सर्व अटींमध्ये असे बरेचशे वृध्द शेतकरी असतात. परंतु आधार कार्ड नसल्याने हे वयोवृध्द शेतकरी या योजने पासून वंचित राहता कामा नये. या शेतक – यांसाठी सरकारने उपाय योजना करणे आवश्यक आहे. व कर्ज मुक्ती योजने अंतर्गत हाताची अंगठे न येणे ही तांत्रीक अडचण असून शेतकरी प्रती खुप काही करणारे प्रभावशाली सरकार योग्य निर्णय घेण्यात पुढे येइल काय ? कोणत्याही अटी व शर्ती शिवाय कर्ज मुक्ती असावी, वृध्द शेतकरी हवालदिल झाले असून सुध्दा सर्व सामान्य मानसाला आधार मिळावा व त्यांच्या कर्जमुक्ती ची रक्कम जमा करण्यात यावी . तसेच शेतक – यांना कर्जमुक्ती योजनेची माहिती काही संबंधीत अधिकारी देत नसणा – या अधिका – यांवर सखोल चौकशी करुन संबंधीतांनी योग्य ती कार्यवाही करावी .या आशयाचे निवेदन देण्यात आले असून निवेदनाचा त्वरीत विचार न झाल्यास सर्व शेतक – यांसह आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. सादर निवेदन देताना दीपक दारोकार ,अभिजीत तेलगोटे ,राजेश रत्नपारखी ,अजय नृपनारायन, जितेंद्र इंगळे, सागर खराटे, शुभम ईसापुरे, शुभम डिगे, शुभम नंदूरकार ,राजेंद्र धांडे, करण वानखड़े ,दर्शन तीवर, विजय मोरे उपस्तित होते..
———————————————-
अनेक शेतकरी असे आहेत की जे वयोवृद्ध आहेत. की ज्यांचे डोळे स्कैन होत नाहीत अंगठेही उमटत नाहीत. त्यामुळे त्यांचे आधारकार्ड निघु शकत नाहित. असे शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ति योजनेच्या लाभापसूंन वंचित न राहावे. त्यासाठी शासनाने त्वरित दूसरी उपाय योजना करावी.
दीपक दारोकार
तेल्हारा