मुर्तिजापूर (सुमित सोनोने)-
सर्व रास्त भाव दुकानदार यांना सूचित करण्यात येते की, माहे जुलै 2020 च्या डाटाबेसमध्ये या लाभार्थ्यांना माहे एप्रिल, मे आणि जून 2020 या महिन्याची वाटप करण्यात आलेली नाही अशा लाभार्थ्यांचा डाटा पाॅस मशीन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी सर्व रास्त भाव दुकानदार यांनी माहे जुलै 2020 च्या वाटपासोबत माहे एप्रिल मे आणि जून या तीनही महिन्यांची डाळ वाटप करावी.
तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना देण्यात आलेल्या मोफत तांदळाचा एप्रिल, मे आणि जून 2020 डाटाबेस माहे जुलै 2020 या महिन्यात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अद्याप पर्यंत मोफत तांदळाचा लाभ देण्यात आलेला नाही अशा लाभार्थ्यांना या महिन्यात मोफत तांदळाचे वाटप करावे.तसेच आत्मनिर्भर योजनेअंतर्गत विस्थापित मजुरांना मंजूर करण्यात आलेला तांदूळ व कुटुंबाला एक किलो अख्खा चना याप्रमाणे उपलब्ध करून दिले या धान्याचा साठा पाॅस मशीनमध्ये 10 जुलै 2020 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, त्यामुळे वरील प्रकारच्या सर्व धान्यसाठाचे वाटप पूर्ण करावे, सदर वाटपामध्ये रास्त भाव दुकानदार यांनी कोणत्याही प्रकारची हयगय केल्यास संबंधित रास्तभाव दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.