अकोला,दि.३-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १८५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७५ अहवाल निगेटीव्ह तर १० अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १६१७ झाली आहे. आज दिवसभरात २२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. आजअखेर ३११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण ११६८८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ११३१९, फेरतपासणीचे १४९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२० नमुने होते. आजपर्यंत एकूण ११६३८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १००२१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १६१७ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज पॉझिटिव्ह
आज दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात तीन महिला व चार पुरुष आहेत. ते पातूर, मोठी उमरी, पारस, इकबाल नगर बुलडाणा, वाकेकर हॉस्पिटल जळगाव जामोद जि. बुलडाणा(हा रुग्ण ओझोन हॉस्पिटल येथून संदर्भित आहे), बार्शी टाकळी, बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह असून त्यात तिघे पुरुष आहेत. ते आडगाव तेल्हारा व मोठी उमरी ( हे दोन्ही रुग्ण जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत.) व अन्य एक सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
२२ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना घरी सोडण्यात आले. हे रुग्ण लक्कडगंज, संदीप सोसायटी, दगडी पुल, हैदरपूरा व बाळापूर येथिल रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले. तर आज सायंकाळी कोविड केअर सेंटर मधून १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात चार जण हरिहर पेठ येथिल, चार जण अकोट फैल येथील तर तीन जण तार फैल, दोन जण भिमनगर, दोन जण गुलजारपुरा तर खडकी व अनिकट पोलीस लाईन येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे.
एक जण मयत
दरम्यान आज पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाला. मयत रुग्ण हा ६५ वर्षीय पुरुष असून शंकरनगर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.२३ जून रोजी दाखल झाला होता. त्याचा आज पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
३११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १६१७ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८४ जण (एक आत्महत्या व ८३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२२२ आहे. तर सद्यस्थितीत ३११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.